भेंडखल क्रिकेट असोसिएशन (बी सी ए) आयोजित ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन, सलामीच्या लढतीत प्रतीक पनवेल संघाने युसीएसए उरण संघावर केली मात

प्रतिनिधी, रुपेश पाटील

भेंडखळ क्रिकेट असोसिएशन (बीसीए) आयोजित 12 वर्षाखालील मुलांच्या लेदर क्रिकेट स्पर्धेला आज (ता. 18) सुरुवात झाली. रायगड जिल्ह्यातील नामांकित सहा संघाचा सहभाग असलेली 35 षटकांची ही स्पर्धा दोन गटात खेळली जात आहे. आज झालेल्या सलामीच्या लढतीत प्रतीक पनवेल संघाने युसीएसए उरण संघावर मात करत पहिला विजय प्राप्त केला.

 युसीएसए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रतीक क्रिकेट एकादमीच्या इशांत पाठकच्या  फिरकी गोलंदाजीसमोर युसीएसए उरण संघ 120 धावांवर गडगडला. त्याने 30 धावांत पाच बळी टिपले. तर अजिंक्य कैयाने तीन बळी घेत त्याला साथ केली. उरण संघाकडून ओम कोळीने सर्वाधिक  43  तर आर्यन निकाळजेने 30 धावा केल्या. प्रत्युत्तरात प्रतीक पनवेल संघाने  121 धावांचे लक्ष्य 3 गड्यांच्या मोबदल्यात 20 षटकांत सहज पार करत विजय संपादन केला. यात कर्णधार वेदांत बोंबले 37 तर इशांत पाठकने 14 धावांचे योगदान दिले. पनवेल संघाचा अष्टपैलू खेळाडू इशांत पाठकला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
  तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन भेंडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच संगीता भगत, ग्रामपंचायत सदस्य शीतल ठाकूर, अभिजित ठाकूर, अजित ठाकूर, लिलेश्वर भगत, किरीट पाटील, भेंडखळ क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष मनोज भगत, भूषण ठाकूर  मुख्य प्रशिक्षक नयन कट्टा, स्पर्धेचे पंच एड. पंकज पंडित, आयोजक शरद म्हात्रे, विशाल ठाकूर यांच्यासह रुपेश पाटील, अमित पाटील, राजाराम मोकल, दत्तात्रेय ठाकूर, निलेश घरत, संदीप ठाकूर, हसुराम भोईर आदिची प्रमुख उपस्थिती होती.  

स्पर्धेतील विजेत्या संघाला स्व. रुपम (आर. आर) पाटील स्मृती करंडक देऊन सन्मानित केले जाणार आहे. तर उपविजेत्या संघांला आकर्षक कंरडक तसेच सामनावीर, मालिकावीर, स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, प्रत्येक सामन्यातील उदयोन्मुख खेळाडूला आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.

संपूर्ण स्पर्धा जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांनुसार खेळवली जाणार असून मुलांमध्ये नेतृत्व क्षमता वाढीस लागावी, त्यांना मोकळेपणाने खेळ करता यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.”

नयन कट्टा
मुख्य प्रशिक्षक, बीसीए भेंडखळ

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page