अलिबाग, अमूलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील मौजे कामथ येथे कमळ कांतीलाल गुप्ता व इतर चार जण यांच्या जागेत खाडीकिनारी खारफुटीवर सहा ते सात फुटाचा भराव टाकून खारफुटीची खुलेआम कत्तल केली आहे.मात्र किहीम मंडलाधिकारी एस.व्ही.पाटील यांनी सदर जागेचा पंचनामा केला असून तो संशयास्पद असल्याने त्या जागेचा पंचनामा हा दुसरे मंडलधिकारी यांच्यामार्फत करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे मीडिया सेलचे महाराष्ट्र राज्य सचिव अमूलकुमार भलगट यांनी अलिबाग येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे व अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अलिबाग तालुका मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असल्याने मोठमोठे उद्योगपती सहित विविध क्षेत्रातील नामांकित हे अलिबाग तालुक्यात सेकंड होमच्या शोधात असतात.सेकंड होमसाठी धनदांडगे त्यांच्याकडे असलेल्या धनाचा वापर करून कायद्याची सर्रासपणे पायमल्ली ही स्थानिक दलाल तसेच राजकिय पदाधिकारी तसेच स्थानिक अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून केली जात आहे.
सार्वजनिक सुट्टी काळात मोठ्या प्रमाणात खाडीकिनारी भराव टाकून खारफुटी नष्ट केली जात आहे. स्थानिक प्राधिकरण या भराव तंत्राकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे.
अलिबाग तालुक्यातील किहीम सजा अंतर्गत असणाऱ्या कामथ येथे कमळ कांतीलाल गुप्ता व इतर चार जण यांच्या ११७/११९/१२०/१२१/१ व इतर ६ बिनशेती जागेत दिनांक५ मे २०२३ रोजी बुद्ध पूर्णिमा तसेच त्याला लागून असलेल्या ६व ७ मे २०२३ या तीन दिवसांत खारफुटीवर हजारों ब्रास माती टाकून पाच ते सहा फुटाचा भराव करण्यात आला असून या भरावासाठी हजारो ब्रास मातीचा(गौण खनिज)वापर करण्यात आला होता. याबाबत अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतर मात्र आपले मंडलाधिकारी एस. व्ही.पाटील यांनी दिनांक ०८ मे२०२३ रोजी केलेल्या पंचनाम्यात केवळ ३२मीटर लांबी आणि ८८ मीटर रुंदी या जागेत केवळ १९९.०१ब्रास एवढी माती भराव केला असून त्याची उंची ही फक्त ०.२०मीटर इतकी दाखविण्यात आली आहे.सदर पंचनामा करण्यासाठी मंडळाधिकारी एस. व्ही.पाटील यांनी स्थानिक किहीम सजाचे तलाठी शिंगडे यांना सोबत न घेता पोलीस पाटील आणि कोतवाल या दोघांना जागेवर घेऊन पंचनमा केला आहे.आणि केलेल्या पंचनाम्यात खारफुटी अथवा खाडी याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही आहेमात्र हा पंचनामा शासनाच्या हिताचा नसून तो भु मालक कमळ कांतीलाल गुप्ता व इतर चार जण यांच्या मर्जीतील केला आहे.तरी सदर पंचनामा हा संशयास्पद असल्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर जागेत भराव करून त्या ठिकाणी जेसीबी लावून जागा सपाटी करण करून जागेची उंची कमी करण्यात आली आहे.त्याचप्रमाणें आता त्याजागेवर जुने घर तोडल्याचे साहित्य आणून टाकण्यात आले आहे.आता त्या साहित्य त्या मातीवर जेसीबीच्या साहाय्याने अंथरून मातीचा वापर कमी करण्यात आला असल्याच्या तयारीत भु मालक आहेत.
तरी सदर जमिनीवरील पंचनामा हा लवकरात लवकर परत करण्यात यावे तसेच पंचनामा परत करण्यासाठी मंडलाधिकारी एस. व्ही.पाटील ऐवजी इतर मंडलधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे.