अलिबाग, अमूलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील गृप ग्राम पंचायत वरंडे हद्दीतील वरंडे पाडा येथील सरकारी गुरचरण जागेत अनधिकृत बांधकाम होत असून त्या बांधकामावर सरपंच सुधीर चेरकर, ग्रामसेवक राहुल पोरे यांच्याकडून कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ वरंडे पाडा येथील समीर संजय घरत सहित इतर दहा जण अलिबाग येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिराकोट तलाव येथे आमरण उपोषणास सुरवात केली आहे.

वरंडे पाडा येथील प्रमोद मधुकर ठाकूर यांनी सरकारी गुरचरण गट क्रमांक 38 क्षेत्र 10.23.30या जागेत अनधिकृतपणे गुरचरण जागा असतानाही बांधकामास सुरवात केली आहे.सरकारी गुरचरण जागेत कोणत्याही प्रकारची बांधकामे करू नये अथवा अतिक्रमण करू नयेअशी सूचना वरंडे सजा तलाठी शिंगे यांनी तोंडी दिली होती.
वरंडे तलाठी शिंगे यांच्या आदेशाची पायमल्ली करीत प्रमोद ठाकूर यांनी त्या जागेत अनधिकृत बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे.त्याबाबत समीर संजय घरत आणि इतर दहा जणांनी ग्रामसेवक याना दि. १२/०५/२०२३ रोजी ४ वाजण्याच्या दरम्यान ग्रामपंचायतमध्ये जाऊन सरपंच व ग्रामसेवक यांना विचारणा केली की वरील प्रमोद मधुकर ठाकुर यांनी जोता बांधत आहे याबाबत विचारणा केली तेव्हा सरपंच व ग्रामसेवक यांनी मला उत्तर दिले की ग्रामस्थ बांधकामा थांबविण्यासाठी गेलो होतो परंतु प्रमोद मधुकर ठाकुर हा काम थांबवत नाही तुम्हाला जे करायचे आहे ते करा मी काम थांबवु शकत नाही असे उत्तर दिले. नंतर ग्रामसेवक यांच्याकडे लेखी अर्ज देऊन सुद्धा तुम्ही का काम थाबवले नाही यावर ग्रामसेवक म्हणाले की मी त्यांस काम थांबवण्याबाबत नोटीस दिली आहे परंतु आत्ता माझावर सरपंच व प्रमोद मधुकर ठाकुर यांचा दबाव आहे असे उत्तर दिले आहे.
सदर घटनेबाबत वरंडे पाडा ग्रामस्थामध्ये संताप निर्माण झालेला आहे. शासनाचे गुरचरन जमिनित कोणीही अतिक्रमण न करण्याबाबत आदेश असल्याने व मधुकर गोविंद ठाकुर यांच्या नावे स्वतची प्रॉपटी (शेतजमीन) आहे. आता ग्रामस्थांनी त्या विरोधात सदर प्रमोद मधुकर ठाकुर यांनी तात्काळ बांधकाम केलेले असुन ते शासनाने तात्काळ थांबवणेचे आहे व घर बांधायला टाकलेले मटेरियल शासनाने जप्त करण्यात यावे अशी मागणी केली होती.मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यास आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सुद्धा दिला होता.तरी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी जाणीवपूर्वक कानाडोळा करीत बांधकाम करण्यास एक प्रकारे छुपी मदत केली आहे.
तरी सरपंच व ग्रामसेवक, प्रमोद मधुकर ठाकुर यांच्यावर कडक करवाई करावी , प्रमोद मधुकर ठाकुर यांनी केलेले बांधकाम तात्काळ थांबवावे व त्यांनी टाकलेले मटेरियल जप्त करण्यात यावे या मागणीसाठी संजय घरत यांच्यासाहित इतर दहा जण आजपासून उपोषणास बसले आहेत.