उरण, बातमीदार
उरण तालुक्याील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा सारडे येथे "हेल्केन अढेसीव टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड" या जर्मन कंपनीने आपला २५ वा वर्धापन दिन साजरा केला . या कार्यक्रमा अंतर्गत मुलांच वाचन , लेखन घेण्यात आले, पर्यावरणाशी निगडित प्लास्टिक वापर न करणे, विज बचत, पाणी बचत या विषयांवर चित्रफित दाखउन मुलांना निसर्ग संवर्धनबाबत माहिती देण्यात आली. पर्यावरणाशी संबंधित चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा, बास्केट बॉल , फुगे फुगविणे, अशा विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या. या वेळी विद्यार्थ्यांना बक्षीसचे वाटपही करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे जर्मन कंपनी हेल्केन अढेसिव टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड चे प्रतिनिधी ऋषाली ठाकूर, राकेश पाटील, तनुजा तटकरे, प्रवीण सर , तसेच सारडे गावचे सरपंच रोशन पाटील,आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य , सारडे शाळा व्यवस्थापन सदस्य व शिक्षणप्रेमी हिरामण पाटील आणि सदस्य गोपाळ पाटील सर त्याच बरोबर सारडे विकास मंच अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे , प्रथम शिक्षण संस्थेच्या उरण टीम लीडर रणिता ठाकूर आणि प्रथम प्रतिनिधी सोनाली म्हात्रे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आणि कोप्रोली केन्द्र प्रमुखा उर्मिला म्हात्रे ,आणि सहशिक्षिका अपूर्वा घरत .उपस्थित होत्या. स्पर्धांच्या शेवटी मुलांनी आलेल्या पाहुण्यांसोबत नृत्य केले.