संरक्षणकरत्या पोलिसांवरच माथेफिरुचा डंपर हल्ला

उरण, प्रतिनिधी

दोन भावानमधील भांडणाची सणक डोक्यात घेऊन, हेवा डंपर सुसात पळवत अनेक गाडयांचे नुकसान करून, पोलीस चौकीला दिली धडक….

न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील उलवे सेक्टर 10 मधील पोलीस चौकीवर हेवा डंपर डम्परणे धडक दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये पोलीस चौकीचे नुकसान झाले आहे. तर सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. दोन भावांमध्ये आपापसात झालेल्या भांडणातून मोनीश घरत या 23 वर्षीय तरुणांने भांडणाची सणक डोक्यात घेऊन, हा प्रकार केला असून, तर घटनेवेळी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

उलवे नोड मधील सेक्टर १०(बी)मधील पोलीस चौकीवर बुधवारी रात्री १२ साडेबारा वाजता एका इसमाने डंपरची जोरदार धडक देत नासधूस केली आहे. तसेच चौकीत उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनासह व येथील खाजगी वाहनांची ही नासधूस केली आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. या बेदरकार वाहन चालकाला अटकाव करीत,पोलीस संरक्षणार्थ डंपर वर गोळीबार करण्यात आला आहे. न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मोडणाऱ्या या पोलीस चौकीत ही घटना घडली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे पोलीसांची सुरक्षाही ऐरणीवर आली आहे. उलवे नोड मधील शेलघर येथील दोन भावंडात वाद झाला. त्यानंतर या घटनेची तक्रार करण्यासाठी एक भाऊ आपला डंपर घेऊन पोलीस चौकीवर आला. त्याने पोलीस चौकी म्हणून उभ्या करण्यात आलेल्या ४० फुटी दोन कंटनेर शेडना जोराच्या धडक दिल्या त्यामुळे या चौक्याचे नुकसान झाले आहे. हे बेदरकारपणे सुरू असलेले वाहन थांबविण्यासाठी पोलिसांनी वाहनांवर गोळीबार केला. या घटनेत गस्ती पोलीस वाहनाचे नुकसान झाले आहे.

Please Share

2 thoughts on “संरक्षणकरत्या पोलिसांवरच माथेफिरुचा डंपर हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page