उरण, प्रतिनिधी
तीस वर्षांपासुन प्रतीक्षेत असलेला उरण लोकल रेल्वे प्रकल्पला आणखी काही महिने विलंब होणार असल्याचे दिसून येत आहे. गेले अनेक महिने लोकल सुरु होणार असल्याच्या आनंदात असणाऱ्या उरणकरांच्या आनंदावार आणखी काही महिने पाणी पडणार आहे. या मार्गवरील जासई रेल्वे स्थानकाचे काम अजून पूर्णच झाले नसून, या स्थानाकाला पूर्ण व्हायला अध्याप तीन ते चार महिने लागणार आहे.

मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी तिसऱ्या मुंबईची स्थापना करण्यात आली. यावेळी विविध विकास कामाची घोषणा देखील करण्यात आली होती. उरण, पनवेल आणि बेलापूर विभागातील जमिनी संपदीत करून सिडाकोच्या माध्यमातून या विकास कामाना सुरुवात करण्यात आली. तर हा संपूर्ण विभाग रेल्वेच्या माध्यमातून लोकल सेवेने जोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. यांनंतर लोकल सेवा सुरु झाल्यास या विभागाचा खऱ्या अर्थाने विकास होईल अशी आशा घेऊन येथील स्थानिक नागरिक लोकल सेवेकडे डोळे लावून बसले होता. मात्र तीस वर्षांचा काळ उलटूनही लोकल सेवा सुरु झाली नाही. मुंबई छत्रपती टार्मिनल ते उरण या मार्गचे काम सुरु होऊन, या मार्गवर 2018 पासून लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र ही सेवा खारखोप पर्यंतच सुरु झाली. यांनंतर दुसऱ्या टप्प्यातील खारखोप ते उरण या मार्गावरील अडचणी दूर होऊन, या मार्गवरील उरण, द्रोणागिरी, न्हावा-शेवा, रांजणपाडा या स्थानकांचे काम जलदगतीने पूर्ण करून, लोकल सेवेच्या सर्व चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. मात्र आज तागायात लोकल सेवा सुरु झाली नाही. खारखोप नंतर दुसऱ्या टप्यातील पहिले स्थानक म्हणजे जासई स्थानकाची आजची स्थिती पाहिली तर या स्थानकाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. सध्या या स्थानाकाच्या शेडचे काम सुरु असून, स्थानकाचे 50 टक्के काम बाकी आहे. यामुळे लोकल सेवा सुरु होणार असल्याचे भासावण्यात येतं असले तरी प्रत्यक्षात मात्र अजूनही ही सेवा सुरु होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यामुळे तीस वर्षे लोकल सेवेची आस लागून राहिलेल्या उरणकरांना अजून काही महिने वाट बघावी लागणार आहे हे तितकंच सत्य आहे.