प्रतिनिधी, रायगड
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला आहे. तिथीनुसार साजरा करण्यात येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली होती.
यावेळी, किल्ले रायगडावर पायरी मार्गे जाणाऱ्या बेळगाव येथील २२ वर्षीय तरुण ओंकार भिसे याची प्रकृती बिघडल्याने त्याला पाचाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, यादरम्यान ओंकार याचा दुदैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.