माजी आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न

उरण, सुशांत तांडेल

वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व वृक्षारोपणाचे कार्यक्रमाचे आयोजन

आमदार मनोहर भोईर सामाजिक संस्थेचे हिंदू रक्षक मित्र मंडळ नवीन शेवा यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक 01 जून 2023 रोजी अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम नवीन शेवा येथे आयोजित केला होता, यावेली मोठा केक कापून व भव्य सत्कार करून मा आमदार मनोहरशेठ भोईर यांना सन्मानित करण्यात आले, त्यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यातील 62 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेण्यात आले व 62 झाडांचे वृक्षारोपण नवीन शेवा परिसरामध्ये करण्यात आले, यावेळी मार्गदर्शन करताना मा आमदार मनोहरशेठ भोईर म्हणाले की माझा वाढदिवस या मंडळांनी दरवर्षीप्रमाणे 62 विद्यार्थी दत्तक घेतले व वृक्षारोपण केले या त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमामुळे मी भारावून गेलेलो आहे त्यांच्या कार्याने मी नेहमीच प्रभावित होतो असे त्यांनी मंडळाला शाब्बासकी दिली, यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेनेचे उरण तालुकाप्रमुख श्री संतोष ठाकूर म्हणाले की आज आमच्या आमदार साहेबांचा वाढदिवस आहे आणि 2024 ला ते पुन्हा आमदार करण्यासाठी आपण आज पासून कटिबद्ध होऊ या महाविकास आघाडीमध्ये उरण विधानसभेचा उमेदवार हा शिवसेनेचा असणार आहे दुसरा कुठलाही उमेदवार आम्ही सहन करणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले त्यामुळे आजपासून आपण सर्वांनी कामाला लागू असे त्यांनी सर्वांना आवाहन केले, या कार्यक्रमात उपजिल्हा संघटिका सौ ममता पाटील, मा जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, सरपंच सौ सोनल घरत, महिला आघाडीच्या सुरेखा भोईर व जेएनपीटी ते शाखाप्रमुख एल जी म्हात्रे यांची भाषणे झाली तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना उरण शहर संपर्कप्रमुख श्री गणेश म्हात्रे यांनी केले, या कार्यक्रमात उपतालुका संघटिका सौ मनीषा ठाकूर व निष्ठावंत शिवसैनिक नितीन ठाकूर यांच्या सौजन्याने तयार करण्यात आलेल्या शिवसेना गीताचे व साहेब या वेबसाईट चे प्रकाशन करण्यात आले तसेच श्री रामणिक म्हात्रे यांच्या सुमधुर गाण्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच चिरनेर येथील शिवधन पतसंस्थेच्या वतीने मा आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यामध्ये 125 डझन वह्या वाटण्यात येतील असे अध्यक्ष श्री गणेश म्हात्रे यांनी जाहीर केले.

कार्यक्रमास उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, उपतालुका संघटक के एम घरत, मा सभापती विश्वास म्हात्रे, शिक्षक नेते नरेश मोकाशी, निर्भय म्हात्रे, शिवधन पत संस्थेचे अध्यक्ष गणेश म्हात्रे, द्रोनागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर, शहर संघटक किसन म्हात्रे, कामगार नेते गणेश घरत, युवा नेते दीपक भोईर, उपसरपंच कुंदन भोईर, सौ मालतीताई भोईर, उपजिल्हा संघटिका सौ अनिता पाटील, तालुका संपर्क संघटिका सौ प्रणिता म्हात्रे, विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, उप तालुका संघटिका सौ मनीषा ठाकूर, सौ भगत, शाखा संघटिका सौ वैशाली सुतार, अल्पसंख्यांक यांचे महिला तालुकाध्यक्ष हुसेना शेख, शहराध्यक्ष मुमताज भाटकर, विभागप्रमुख भूषण ठाकूर,संदेश पाटील, अनंत पाटील मनोज पाटील, मा जि प सदस्य जीवन गावंड, शेका पक्षाचे चिटणीस विकास नाईक, शाखाप्रमुख शैलेश भोईर तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, दिव्यांग मित्र व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन आमदार मनोहर भोईर सामाजिक संस्थेच्या हिंदू रक्षक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री दयाळशेठ भोईर उपाध्यक्ष दिनेश घरत, खजिनदार परशुराम ठाकूर व सर्व आजी-माजी पदाधिकारी व सदस्य यांनी यांनी केले होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page