उरण, प्रतिनिधी
कोकण आणि रायगड मध्ये काँग्रेस ला संजीवनी देण्यासाठी सर्व दृष्टीने सक्षम अशा रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत याना मावळ ची उमेदवारी द्या .रायगड जिल्हा काँग्रेस नेते , पदाधिकारी ,महिला काँग्रेस ,युवक काँग्रेस अल्पसंख्यक सेल ,ओ .बी .सि .सेल सेवादल सर्व कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्टींकडे एकमुखी मागणी केली आहे.
काँग्रेस पक्षाने राज्यातील लोकसभा मतदार संघात उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली असून, कोणकोणत्या जागा काँग्रेस सक्षमपणे लढऊ शकतो याची चाचपणी करण्यासाठी २ व ३ जून रोजी टिळक भवन दादर मुंबई येथे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत हे मावळ लोकसभा मतदार संघातून चांगली लढत देऊ शकतात या वर चर्चा झाली असून, महाविकास आघाडीच्या बैठकीत मावळ लोकसभा मतदार संघ हा काँग्रेस पक्षासाठी सोडून घेण्यावर एकमत होत आहे.