उरण, विरेश मोडखरकर
1 जून पासून साहासकीय मासेमारी बंदी करण्यात आली आहे. मात्र बंदी आदेश झूगारून मासेमारी सुरूच.
राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर वादळचे संकेत असून, समुद्री भागात बोटी सोडण्यास मनाई असताना खोल समुद्रामध्ये मासेमारी सुरूच.
संदर्भासाठी छायाचित्र, सौजन्य गूगल
पावसाळा सुरु होण्यापूर्वी मत्स्य प्रजानन काळ आणि वदळी हवामान तयार होत असल्याने, राज्यशासनाच्या मत्स्य विभागाकडून 1जून ते 1 ऑगस्ट पर्यंत मासेमारी बंदी केली आहे. या काळामध्ये समुद्रातील मासे प्रजानन करून आपली उत्पत्ती वाढवत असतात. मात्र अलीकडच्या काळात कोणतेच निर्बंध न पाळता मासेमारी करण्यात आली आहे. याचाच परिणाम म्हणून समुद्रातील माश्याचे प्रमाण घटले आहे. यामुळे निसर्गचक्राची साखळी तुटली जात असून, समुद्रीय व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. यामुळे ही बंदी लागू करण्यात येतं असते. मात्र या बंदी काळातच अधिकाऱ्यांशी हातमीळवणी करून, बेधडकपणे मासेमारी करत असतात. यावर्षी dekhilb1 जून पासून मासेमारी बंदी जाहीर झाल्यानंतरही अनेक बोटी समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी गेल्या असल्याची विश्वासनीय माहिती मिळत आहे. तर पकडून आणलेली मासली मध्येरात्रीच्या अंधारात लिलाव करून परस्पर राज्यातील विविध ठिकाणी पाठवण्यात येत आहे.
मासेमारी बंदी काळात बेकायदा मासेमारी करत असताना, सरसकट मासेमारी केली जात असल्याने, मोठ्या माशांसोबत नवी पैदास असलेले मासेही पकडण्यात येतं आहेत. यामुळे शासनाच्या बंदीचा उद्देश नक्कीच साध्य होत नाही. तर संधीसाधु नाखवा आपले खिसे भरण्याचा धंदा तेजीत मात्र तेजीत चालवत आहेत. याकडे प्राधासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर नक्कीच समुद्रीय पर्यावारणाला धोका निर्माण होणार आहे.