अलिबाग, अमूलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील मौजे थेरोंडा खंडेरावपाडयातील भरवस्तीत असलेल्या खंडोबा मंदिरातील देव्हारातील चांदीच्या मूर्त्यांची चोरीप्रकरणातील आरोपी महेश नंदकुमार चायनाखवा महेश नंदकुमार चायनाखवा (वय 38 वर्षे, रा. आगल्याचीवाडी थेरोंडा, ता.अलिबाग, जि. रायगड )यास अटक करून त्याच्याकडून शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस उप अधीक्षक अलिबाग अरुण भोर ,रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे उपस्थित होते.

थेरोंडा पाचपाडे कोळीवाडयाचे कुलदैवत असलेल्या खंडेरावपाडयातील खंडोबा मंदिरात दिनांक 18/05/2023 रोजी रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील थेरोंडा येथील खंडेरावपाडया- तील खंडोबा मंदिरातील देवदेवीतांच्या चांदीच्या मुर्त्यांचे टाक, चांदीचे लोलक-गाठया’ तसचे आगल्याचीवाडी येथील मुंबईकर, कुटूंबीयांचे कुळदैवताचे देवदेवीतांच्या चांदीच्या मुर्त्या टाक’, एकविरा देवीचा मुखवटा व ढोलके कुटूंबीयाचे कुळदैवताचे देवदेवीतांच्या चांदीच्या मुर्त्या टाक, चांदीचे लोलक गाठया चोरीस गेले बाबतची खबर गोरक्षनाथ लक्ष्मण नवरीकर,( रा. खंडेरावपाडा) यांनी दिल्याने, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रेवदंडा पोलीस ठाण्यांत गुन्हा रजि. नं. 119/2023 भा.द.वि. सं. कलम 380,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिनांक 29/05/2023 रोजी रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गणपती मंदिर गणपती पाडा आगळ्याची वाडी येथील कोळी बांधवांची बैठक घेतली असता महेश नंदकुमार चायनाखवा वय 38 वर्षे, रा. आगल्याचीवाडी थेरोंडा, ता.अलिबाग, जि. रायगड याच्या घरी 02 इसम हे गेल्या काही महिन्यापासून पैसे मागण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने तपास केला असता महेश चायनाखवा याने लग्नाकरिता व व्यवसायाकरीता 02 इसमाकडून काही रक्कम कर्ज स्वरुपात घेतली होती. परंतु कर्जाची रक्कम महेश चायनाखवा याच्याकडून परतफेड होत नसल्याने सदर 02 इसम हे त्याच्या घरी कर्ज परतफेडी करिता येत असल्याचे निष्पन्न झाले. सदर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने इसम नामे महेश चायनाखवा यानेच मंदिरातील चोरी केली असल्याचा संशया वरून त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. त्याच्या हालचाली या संशयास्पद वाटल्याने त्यास चौकशीकामी ताब्यात घेतले असता त्याने कर्ज परतफेडी करीता चोरी केल्याची कबुली दिली.आरोपी महेश चायनाखवा याने दोन इसम यांच्याकडून एक लाख चाळीस हजार रुपये कर्ज घेतले होते.
दिनांक 30/05/2023 रोजी अटक करून त्यास ; न्यायालयात हजर केले. त्याची पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करून रिमांड मुदतीत त्याने खंडोबा मंदिर येथुन चोरलेला 3 मोठया साईच्या देवदेवतांचे चांदीचे टाक, 6 लहान साईजचे देवदेवतांचे चांदीचे टाक व 1 चांदीचा लोलक-गाठया’ असा 94,800/-रूपयांचा माल तसेच मुंबईकर यांचे कुटूंबीयाचे कुळदैवताचे 4 देवदवीतांचे मुर्त्यांचे’ चांदीचे टाक व एकविरा देवीचा चांदीचा मुखवटा असा 37,800/-रूपयांचा माल आणि ढोलके कुटूंबीयांचे 4 देवदवीतांचे मुर्त्यांचे चांदीचे टाक व चांदीचा लोलक- गाठया असा 28,200/-रूपयांचा माल एकुण गुन्हयात चोरलेला 1,60,800/-रूपयांचा सर्व 100% माल हस्तगत करण्यांत आलेला आहे.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे रायगड, पोलीस उप अधीक्षक अलिबाग, अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास मुपडे, पोलीस उपनिरीक्षक दीपक म्हशिलकर, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, सहाय्यक फौजदार पी.डी.देसाई, पोलीस हवालदार दिनेश पिंपळे, महिला पोलीस हवालदार अस्मिता म्हात्रे, महिला पोलीस हवालदार सुषमा भोईर, पोलिस नाईक, राकेश मेहतर, पोलीस शिपाई मनोज दुम्हारे, पोलीस शिपाई पंजाब पोळे व स्था. गु. शाखेतील पोलीस उपनिरीक्षक साठे, पोलीस हवालदार दबडे पोलीस हवालदार हंबीर, पोलीस शिपाई लांबोटे, पोलीस हवालदार चव्हाण अशांनी अथक प्रयत्न करून कौशल्याने आरोपीस अटक करून गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.