उरण, वैशाली कडू
पूर्वीचे पँथरचे कार्यकर्ते संजय गायकवाड यांचे सामाजिक काम पाहता, कामगार व सर्व थरातील श्रमिक वर्गात कामाचे संघटन कौशल्य पाहून मा. रामदास आठवले केंद्रीय समाज कल्याण मंत्री, रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंगे साहेब, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ दादा कासारे, रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा शुभहस्ते संजय जनार्दन गायकवाड यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा उरण तालुका अध्यक्ष या पदावर पुनरनियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती आंध्र कला समिती हॉल, नवीन पनवेल येथे २ जुलै २०२३ रोजी झाला. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तित होते.
संजय गायकवाड यांचा निवडीने उरण तालुक्यातीळ सर्व थरातील लोकांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या चाहत्यांनी संजय गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.