उरण, प्रतिनिधी
वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र, उरणच्या वतीने रविवार ९ जुलै 2023 रोजी उरण तालुक्यातील कोप्रोली वाडी, उरण येथे वाडीवरील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य, पौष्टीक खाऊ आणि छत्री वाटप करण्यात आले.
वनवासी कल्याण आश्रमचे कुणाल सिसोदिया सहसचिव वनवासी कल्याण आश्रम , सदस्य ऍड.आकाश शाह, खजिनदार दीपक गोरे, अंशकालीन कार्यकर्त्या व ग्रामपंचयात सदस्या बेबी ताई , आमचे सहकारी मित्र कुणाल पाटील आणि संजय दाते ( सेवानिवृत्त उ. न. प. कर्मचारी) यावेळी उपस्थित होते. कुणाल शिसोदिया यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या या कार्यक्रमाचा ३५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. तर अशा प्रकारचे कार्य नियमित करून आवश्यक बाबी विद्यार्त्यांना पुरवल्या जातील असे आस्वासन देत, येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक मदत देखील करण्यात येईल असे आश्वासन कुणाल शिसोदिया यांनी यावेळी दिले आहे.