उरण, मनोज ठाकूर

वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र उरण च्या वतीने विंधणे वाडी, केळ्याचा माळ, चांदयली वाडी उरण येथे विद्यार्थ्यांसाठी ,वह्या,पुस्तके,शालोपयोगी साहित्य, पौष्टीक खाऊ आणि छत्री वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी गुगल चे गूगल इंजिनिअर मॅनेजर समीर पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. समीर पाटील यांनी मुलांशी संवाद साधात गूगल बद्दल माहिती सांगून शिक्षण आणि डिजिटल युगामधील गूगलचे महत्व पटवून दिले. यावेळी समीर पाटील यांच्या पत्नी मेघा पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात रोज एकत गणिताचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, खाऊ आणि पावसाळ्याचा आधार छत्री वाटप झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण पहायला मिळाले. मात्र हे क्षण काही वेळापुरातच न रहाता कायम स्वरूपी रहावे आणि यासाठी वस्त्यांवरील मुलांनी शिक्षणाची कास धरली पाहिजे असे मत मांडून, जमेलेल्या विद्यार्थ्यांना वत्यांच्या पालकांना वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष मनोज ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.
दुर्गम आणि दुर्लक्षित आदिवासी वाड्या वस्त्यांवरील रहाणीमान सुधारून, आदिवासी बांधव समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी वनवासी कल्याण आश्रम प्रयत्न करत आहे. या संस्थेमार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.