उरण, वैशाली कडू
उरणमधील जलतरणपटू आर्यन मोडखरकर याने पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स येथे आयोजित जलतरण स्पर्धेत ५ सुवर्ण पदकाची लयलूट केली. या यशाबद्दल आर्यन मोडखरकर याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ऍक्वाटिक असोसिशन ऑफ रायगड यांच्या वतीने “कर्नाळा स्पोर्ट्स”, पनवेल येथे आज घेण्यात आलेल्या, दुसऱ्या, सबजुनिअर जिल्हा ऍक्वाटिक चॅम्पिनशिप २०२३ मध्ये उरणचा आर्यन मोडखरकर याने पाच स्पर्धामध्ये भाग घेत पाच ही स्पर्धेत सुवर्णपदकांची कामाई केली.
यापूर्वी ही आर्यन मोडखरक याने मध्यप्रदेश मधील इंदौरमध्ये ही सुवर्णपदक मिळविले होते. तसेच इतर अनेक स्पर्धेत त्यानी सुवर्ण पदक मिळविले आहेत. आर्यनच्या या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.