उरण, विरेश मोडखरकर
साराडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागेंद्र म्हात्रे यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
उरण पूर्वा विभागातील सारडे या छोटयाशा गावातुन कार्य सुरु करणाऱ्या “सारडे विकास मंच”चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी “कोमनादेवी” डोंगरावर निसर्ग क्रांती केली आहे. या ओसाद डोंगरावर त्यांनी विविध झादानाच्यारूपात निसर्ग बाग फुलावण्याच काम केल आहे. तर या बागेला नैसर्गिक उद्यानाचे रूप प्राप्त व्हावे या संकल्पनेतून येथील मोठं मोठ्या दगडावर वन्यजीवांचे चित्र रेखाटले आहेत. यामुळे या बागेला जीवंतपाणा आला असून, येथे कधीही न येणारा माणूस आता गर्दी करू लागला आहे. नागेंद्र महातारं यांनी सुरु केलेल्या या उपक्रमात आता असंख्य हात मदतीला येत आहेत. अनेकवर्षे मेहनत घेत ओसाद भूमीवर नंदनवन फुलावत असताना अनेक अडचणींचा सामाना नागेंद्र म्हात्रेनां करावा लागला आहे. यामध्ये वाढीस आलेल्या झाडानां वणवा लागून झाडे नष्ट झाल्याचे प्रकार देखील घडले आहेत. मात्र अनेक अडचणीतून नागेंद्र म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्यानी माघर न घेता “कोमनादेवी ऑक्सिजन पार्क” तयार केले आहे. आज या पार्कमध्ये हजारो पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत आहेत. अशा या नागेंद्र म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहात्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत, विविधता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये 4 लाईफ कंपनी तसेच साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे राकेश पाटील यांच्यातर्फे चिरनेर आदिवासी वाडीवर सावा वॉटर प्युरिफायर कॅन वाटप करण्यात आले. हरिश म्हात्रे तसेच सदाबहार ग्रुप तर्फे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे येथे वृक्षारोपण करण्यात आले. तर नंदाई प्रतिष्ठान वशेणी डॉ.हिराचंद पाटील याच्या तर्फे वशेणी येथे वृक्षारोपण करण्यात आले. श्री.उपेंद्र ठाकुर सर याच्या तर्फे राजिप शाळा पालेला मुलांना टाय, बेल्ट आणि खाऊ वाटप करून, नागेंद्र म्हात्रे यांचा वाढदिवसाच्या साजरा करण्यात आला. राजिप शाळा सारडे येथे रोहित पाटील, राकेश पाटील, प्रसाद पाटील, डॉक्टर हिराचंद पाटील, त्रिजन पाटील, याच्या कडून सारडे विकास मंचच्या नावाने लेक्चर स्टँड (पोडीयम) भेट देण्यात आले. यावेळी सुयश क्लासेस आवरे निवास गावंड, विराट पाटील, संतोष म्हात्रे याच्या तर्फे ब्राह्मण देव आवरे येथे फुलझाड लागवड करून, बाग तयार करण्यात आली. राजिप शाळा गोवठणे यांना रामनाथ पाटील याज कडून घड्याळ भेट करण्यात आले. श्री.छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय वशेणिला रोहित पाटील याज कडून घड्याळ भेट देण्यात आले. तर प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन संस्था उरण तालुका प्रमुख रणिता ठाकुर तसेच सहकारी टीम कडून पुनाडे आदीवासी वाडी तसेच राजिप शाळा कोप्रोली येथे खाऊचे वाटप करण्यात आले.