पिल्लई रसायनीच्या विद्यार्थ्यांना क्रूझ क्षेत्राबद्दल मार्गदर्शन

इंडस्ट्री एक्स्पर्ट गणेश बंगेरा यांनी साधला संवाद

प्रतिनिधी, श्वेता भोईर

पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पस, रसायनी येथील हॉस्पिटॅलिटी स्टडीज (हॉटेल मॅनेजमेंट) विभागातर्फे “वर्ल्ड ऑफ क्रूज’ या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन १८ जुलै रोजी करण्यात आले होते. यावेळी इंडस्ट्री एक्स्पर्ट गणेश बंगेरा यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच क्रूज क्षेत्राबद्दल असलेल्या अनेक शंकांचे निरसन केले, हॉस्पिटॅलिटी स्टडीज विभागाच्या प्रोग्रॅम को-ओर्डीनेटर शेफ प्रिया यांच्या सहकार्याने या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

पिल्लई रसायनी येथील हॉस्पिटॅलिटी स्टडिज विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील उपल्बध असलेल्या संधींची माहिती मिळावी यासाठी अनेकविध मार्गदर्शन मित्रांचे आयोजन केले जाते. यावेळी आयोजित सत्रात क्रूझ जहाजावर असलेले विविध विभाग यामध्ये रेस्टोरेंट, किचन, फूड अँड बेव्हरेज, हाऊसकिपींग, फूड प्रोडक्शन, बारटेंडिंग, सर्विस, व अश्या अनेक विभागांमध्ये देश – विदेशात नोकरीच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी लागणारी पात्रता काय आहे, जॉब साठी कुठे आणि कसे अप्लाय करावे अश्या अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रश्नोत्तरांवेळी विद्यार्थ्यांना क्रूज क्षेत्राबद्दल असलेले गैरसमज दूर करत त्यांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. यावेळी बोलताना मार्गदर्शक गणेश बंगेरा यांनी सांगितले कि यशाला शॉर्टकट नाही. संयम आणि कठोर मेहनत अतिशय गरजेचे आहे. अतिशय माहितीपर असे हे सेशन संपन्न झाले.
यावेळी पिल्लई हॉस्पिटॅलिटी स्टडीज विभागाच्या प्रोग्रॅम को-ओर्डीनेटर शेफ प्रिया, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस विभागाचे असिस्टंट प्रोफेसर सुस्मित खेडकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page