अलिबाग, अमूलकुमार जैन
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाचे पोल बदलुन तसेच नवीन पोल बसवण्याकरिता सात हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता गणेश तुकाराम पाचपोहे(वय 55 वर्षे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, गोरेगाव विभाग, रायगड वर्ग 1,रा.ठि. व्हर्टेक्स साॅलिटर, फ्लॅट नं ए2/1203, वारले नगर, कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे 2, चिंचवली वाडी, गोरेगांव, माणगाव, रायगड लाचलुचपत प्रतिबंधक रायगड विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
गणेश तुकाराम पाचपोहे या लाचखोर कार्यकारी अभियंता यांनी तक्रारदार यांच्या राहते घराचे जवळ असलेल्या इलेक्ट्रिक पोल शिफ्ट करण्याकरिता व नवीन इलेक्ट्रिक पोल बसविण्या करिता आलोसे यांनी 7,000/- रुपये लाचेची मागणी ही दिनांक 18 जुलै2023 रोजी मागणी केली होती.मात्र तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत तक्रारदार यांनी तातडीने लाच लुचपत विभागाकडे धाव घेत तक्रार केली. त्यानुसार, लाच लुचपत विभाग रायगड यांनी तक्रारदार यानी केलेल्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर आज दिनांक 19 जुलै 2023 रोजीगोरेगाव येथील त्यांच्या कार्यालयाजवळ सापळा रचण्यात आला. आरोपी लोकसेवक गणेश पाचपोहे याला तक्रारदार यांच्याकडून सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस निरिक्षक रणजीत गलांडे, सहाय्यक फौजदार अरुण करकरे,सहाय्यक फौजदार विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस हवालदार कौस्तुभ मगर,पोलीस हवालदार विवेक खंडागळे पोलीस नाईक सचिन आटपाडकर यांनी केली आहे