शिक्षकांचे खाजगी घरगुती शिकवणीमध्ये अल्पवयीन विदयार्थीनीशी गैरवर्तन

अलिबाग, अमूलकुमार जैन

ग्रामस्थांनी दिला चोप ; रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

खाजगी घरगुती शिकवणी मध्ये अल्पवयीन विदयार्थीनीशी गैरवर्तन करणार्‍या शिक्षकांला ग्रामस्थांनी चांगलाच चोप देऊन रेवदंडा पोलिसाच्या ताब्यात दिले. अल्पवयीन विदयार्थीनीशीं गैरवर्तन करणार्‍या त्या शिक्षकाला रेवदंडा पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्‍त असे की, रेवदंडा बाजारपेठेत हमरस्ताला लागूनच असलेल्या एक मजली इमारतीत भाडयाचे खोलीत चाळीस वर्षीय दशरथ छगन गोसावी हे कला शिक्षक खाजगी घरगुती शिकवणी चालवितात. परिसरातील तिन अल्पवयीन विदयार्थीनीना दि. 28 जुलै रोजी सायकांळी सहा ते आठ वाजणेच्या दरम्यान या खाजगी टयुशन क्‍लास मध्ये हे शिक्षक शिकवीत असताना, त्यातील एका बारा वर्षीय इयत्‍ता आठवी इयत्‍तेतील विदयर्थिनीच्या शरिराशी गैरवर्तन केले, याबाबत सदर प्रकार अल्पवयीन मुलींने आई वडिलांना सांगितले. त्वरीत तेथील स्थानिक ग्रामस्थांनी आई वडिला समवेत जाऊन चैतन्य अपार्टमेंट येेथील रूम मध्ये शिक्षकांस जाब विचारला यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी या शिक्षकांस चांगलाच चोप दिला व पिडीताचे आईने याबाबत रेवदंडा पोलिस ठाणेकडे तक्रार नोंदविली. सदर चाळीस वर्षीय दशरथ छगन गोसावी हे शिक्षक सातारा जिल्हातील पाटण येथील आहेत, सध्या रेवदंडा येथील इमारतीच्या रूम मध्ये राहत असून परिसरातील शाळेत कला शिक्षक म्हणूक कार्यरत आहेत. याबाबत रेवदंडा पोलिस ठाणे येथे अल्पवयीन विदयार्थीनीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार सदर शिक्षकाचे विरोधात भादविकलम 354 सह लैगिक अपराधापासून बालकांचे सरक्षंण अधिनियम 2012 चे कलम 8,10,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल अतिग्रे हे करत आहेत. आरोपी दशरथ गोसावी यास अलिबाग न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे.

खाजगी ट्युशन बाबत पालकांच्या शंका

विविध शासकीय व निमशासकीय शाळामध्ये नोकरीस असताना, अनेक शिक्षकवर्ग खाजगी क्‍लासेस घेत आहेत, याबाबत समस्त नागरिक संप्‍तत प्रतिक्रिया व्यक्‍त करीत आहेत. खाजगी टयुशन क्‍लासेस मध्ये घडलेल्या या गैरप्रकाराने परिसरातील पालकवर्गाचे धाबे दणाणले असून, खाजगी टयुशन क्‍लासेस बद्दल पालकवर्गामध्ये शंका उपस्थित होवू लागल्या आहेत.

शिक्षकीपेशातून कायमस्वरूपी मुक्त करण्याची मागणी

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील विद्यालयात यापूर्वी तीन शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी सोबत विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला आहे.आणि आता घडलेली घटना ही चौथी आहे. अशा स्त्रीलपंट शिक्षकांना शासनाने कठोरात कठोर शिक्षा द्यावी, शिक्षकी पेशातून कायमस्वरूपी मुक्त करण्यात येऊन, आजपर्यंत शासनाने दिलेला पगार सुद्धा व्याजासहित वसूल करण्यात यावा, अशी मागणी समाजवादी पक्षाच्या अलिबाग विधानसभा महिला अध्यक्षा सारिका शिंदे यांनी केली आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page