प्रतिनिधी, वैशाली कडू
भेंडखळ मधील सुकन्या कुमारी डॉ.ज्युतिका योगिता कैलास भोईर हीने गावात पहिली डॉक्टरेट मिळविण्याचा मान पटकावून भेंडखळ गावाचे नाव उज्वळ केले आहे. सातासमुद्राचे पार दुबई येथे फोकस लॉजिस्टीक कंपनीमध्ये कोऑर्डीनेटर या पदावर काम करत असताना आपले काम सांभाळून लॉजिस्टीक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट फिल्डमध्ये Phd ची पदवी संपादन केल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तिने मेहनतीने कॅनडा मधील IATA कार्गो डिप्लोमा, KHDA दुबईचे लॉजिस्टीक आणि सप्लाय चेन स्पेशिलायझेन आणि CIPD इन्स्टिटयुशन लंडन कडून पोर्ट वेअरहाऊस आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट डिप्लोमा आणि एअरपोर्ट मॅनेजमेंट डिप्लोमा अशा विविध परिक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण होवून प्रमाणपत्र प्राप्त केली आहेत.
याबाबत तिने मनोगत व्यक्त करताना याचे सर्वस्वी श्रेय तिने तिच्या आई वडिलांना देवून मुली असून सुद्धा माझ्यासह माझ्या छोट्या बहिणीला जॉब करण्यासाठी परदेशात पाठविताना कुठल्याही प्रकारे आडेवेडे न घेता आमच्यावर विश्वास व्यक्त केल्याने खरच आम्हाला त्यांचा नक्कीच अभिमान वाटत आहे.

याबाबत त्यांच्या आई वडिलांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी दोन्ही मुलींच्या बाबतीत संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील दोन ओळींचा
आधार घेत धन्य झालो या संसारी आम्ही देखीली पंढरी, अशा आपले भाव प्रगट केले. कारण आम्हाला बरेच लोक बोलत होती की, अरे मुलींना कशाला बाहेर पाठवता पण आमच्या मनात एकच होते की, त्यांनी मेहनत करून आपले करियर करायचे आहे आणि त्यासाठी त्यांना पाठींवा देणे आवश्यक आहे आणि असे सर्व मुलींच्या बाबतीत आई वडिलांनी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणे आवश्यक असे वाटते.