महसूल सप्ताह च्या अनुषंगाने उरण येथे अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी शिबिर

उरण, प्रतिनिधी

उरण तहसील कार्यालयामार्फत महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सरकारी कार्यालयातील कर्मचारी नेहमीच सामान्य जनतेशी जोडलेला असतो. व्यस्त जीवन आणि कामाचा तणाव यामुळे या कर्मचाऱ्यांना अनेकवेळा आजराना सामोरे जावे लागते. तर वेळच्यावेळी आरोग्य तपासणी करण्यासाठी वेळ मिळत नाही. यासाठीच महसूल दिनाचे अवचित्य साधून हे शिबीर घेण्यात आले होते. तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्यापुढकारातून हे आरोग्य तपासांनी शिबीर संपन्न झाले. यावेळी ” उरण मेडीकल वेल्फेअर असोसिएशन”चे डॉक्टर्स यांनी शिबिरामध्ये सहभाग घेऊन अधिकारी आणि कर्मचारी यांची आरोग्य तपासणी केली. तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्यासह नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी शिपाई कोतवाल यांच्या रक्ततपासणी, जनरल हेल्थ चेकअप , इसीजि या तपासण्या यावेळी करण्यात आला.

असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मोरे, सचिव डॉ. सत्या ठाकरे आणि डॉ. घनश्याम पाटील यांनी तपासणीनंतर आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. या आरोग्य शिबिरामध्ये असोसिएशन च्या डॉ. अजय कोळी, डॉ. अजय लहासे, डॉ.सपणा उतेकर, डॉ. दया परदेशी, डॉ.सविता डेरे, डॉ. वनीता पाटील यांनी आपले अमूल्य योगदान दिले. तर शिबीरामधे ६५ कर्मच्याऱ्यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेलता.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page