उरण, प्रतिनिधी
सारडे विकास मंच चे अध्यक्ष आणि “कोमना देवी ऑक्सिजन पार्क” चे निर्माते यांच्या नऊ वर्षांच्या तपानंतर कोमनादेवी च्या परिसरातील ओसाड डोंगराचा कायापालट करून आज अनोख्या रूपानं तिथ एक नंदनवन उभं झालं आहे. विविध प्रकारची झाडे लावुन त्याचं संगोपन करून, डोंगर हिरवागार बनवला. स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ सुंदर बनविला असून, अनेकोत्तम संकल्पना सत्यात उतरवून एक उत्तम पर्यटन स्थळ निर्माण केलं आहे. म्हणूनच आज असंख्य पर्यटक या पार्क ला भेट देतात आणि मनमुराद आनंद लुटत आहेत. याच कोमनादेवी ओजसीजन पार्कमध्ये आता पर्यटकांसाठी सेल्फी झोनची निर्मिती करण्यात आली आहे.
कोमनादेवी परिसराचे बदलते रूप पाहीन निसर्गप्रेमी प्रभावित होऊन निसर्ग संरक्षणासाठी सहभाग नोंदवून येथील निसर्ग अधिक खुलावण्याचे काम करत आहेत. तर वाढती पर्यंतक संख्या पाहता येथील भागामध्ये निरनिराळे प्रयोग करण्यात येत आहेत. जेणेकरून येथे पर्यटक आकर्षित होऊन, निसर्ग संवर्धनाला मदत होईल. असाच एक उपक्रम सामाजिक क्षेत्रात काम करणारे उत्कृष्ट गायक देवेंद्र पाटील आणि शशिकांत पाटील( कोप्रोली) यांनी येणाऱ्या पर्यटकांसाठी सेल्फिझोनची उभारणी केली आहे. आपण निसर्गात हिंडताना प्रत्येकालाच सेल्फीचा मोह होत असतो. आणि एक छानशी आठवण आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा आनंदही काहीसा वेगळाच असतो. अशाच पर्यटकांसाठी ‘एक सुंदरअसं “सेल्फीझोन” ची भेट या पार्क साठी दिली आहे. द्रोणागिरी लिव्ह लाईफ-समूह, या समूहाचे घनश्यामजी कडू, रमेशजी म्हात्रे, गोपाळजी पाटील आणि सहकारी यांच्या हस्ते या सेल्फीझोन चे उद्घाटन पार पडले. या प्रसंगी सा.वि.मं. चे नागेंद्र जी म्हात्रे , हरीश म्हात्रे-खोपटे, हरीश म्हात्रे पाले, संतोष जोशी, सचिन पाटील, विनायक गावंड, तुकाराम गावंड आदी निसर्गप्रेमी उपस्थित होते. तसेच त्रिजन पाटील, रोहित पाटील, निल दानिश, निरव, विभा, सई या सर्वांचं सहकार्य लाभले. या सेवे साठी सारडे विकास मंच चे अध्यक्ष अर्थात कोमनादेवी ऑक्सिजन पार्क चे निर्माते नागेंद्र म्हात्रे यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.