उरण, प्रतिनिधी
उरण तालुक्यातील भौगोलिक स्थिती आणि निसर्गाचे बदलते स्वरूप पहाता, येथील परिसरामध्ये शासकीय आपत्ती व्यवस्थेसोबत आपातकालीन परिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी “आपातकालीन मदतीसाठी” या ग्रुपची निर्मिती करण्यात आली आहे. या ग्रुपमधील सदस्यांना नागरी सौरक्षण दलामार्फत प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहे.
आपातकालीन परिस्थितीमध्ये प्रत्येक नागरिकांने सजग राहणे गरजेचे आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तात्काळ मदतीसाठी हात पुढे केला पाहिजे. याच जाणीवेतून उरण तालुक्यातील आपातकालिन परिस्थितीमध्ये जास्तीतजास्त मदत उपलब्ध व्हावी या हेतूने “आपातकालीन मदतीसाठी” या ग्रुपची निर्मिती करण्यात आली आहे. या ग्रुपमधील सदस्यांना यासंदर्भातील प्रशिक्षण मिळणे गरजेचे असून, प्रशिक्षित सदस्य अधिकाधिक उत्तम कार्य करूशकेल या हेतूने सदस्यांच्या प्रशिक्षणाला नागरिसौरक्षण दलाच्या माध्यमातूम सुरुवात करण्यात आली आहे. प्रशिक्षण वर्गाला उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बाबासो काळेल यांनी उपस्थिती दर्शवून सुरुवातिचा हिरवा कंदील दाखवळा आहे. तर आपातकालीन परिस्थितीमध्ये आवश्यक मदतीसाठी सहकार्य करून, ग्रुपचा हेतू साध्य करण्यासाठी सोबत असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. नागरी सौरक्षण दलाचे मनोहर म्हात्रे आणि ग्रुपचे सदस्य विलास पाटील यांच्या पुढकारातून हे प्रशिक्षण होत असून, प्रशिक्षणार्थिना प्रमाणपत्र आणि नागरिसौरक्षण दलाचे ओळखपत्र देखील देण्यात येणार आहे.