उरण, प्रतिनिधी
उरण तालुक्यामध्ये भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय येथे तहसीलदार उद्धव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करून, देशाचा ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी ध्वजारोहण करून, सलामी देण्यात आली.
देश स्वतंत्र झाल्याला आज ७६ वर्षे झाली आहे. स्वातंत्र्य पूर्वी काळापासुन आजपर्यंत देशभरात अनेक बदल झाले आहेत. मात्र स्वातंत्र्य दिवसाच्या मोहोत्सवाचा उत्साह आणि जोश तसाच कायम आहे. देशाचा ७६ वा स्वातंत्र्यादिन उरण तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी उरण तहसील कार्याल्याच्या आवारात शासकीय ध्वजारोहण पार पडेले. उरणचे तहसीलदार उध्वव कदम यांनी ध्वजारोहण करून, राष्ट्रध्वजला सलामी दिली. तर नागरी सौरक्षण दलाच्या प्रांगणातही ध्वजारोहण करण्यात आले. तालुक्यातील शासकीय कार्यालये, शाळा, राजकीय पक्ष कार्यालये या ठिकाणी देखील राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी इरसालवाडी येथे दरड कोसळून घडलेल्या दुःखद घटनेवेळी मदतकार्य करणाऱ्या नागरी सौरक्षण दलातील जिगरबाज स्वयंसेवकांना तहसीलदार उद्धव कदम यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवीण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा गायक गोपाळ पाटील यांनी देशभक्तीपर गीत गाऊन स्वातंत्र्यसाठी बलिदान देणाऱ्या भारत मातेच्या विरपुत्रांना श्रध्दांजली वाहिली.