लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या वतीने वाहतूक पोलीस आणि महामार्गावरील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

प्रतिनिधी, भक्ती साठेलकर

लायन्स क्लब ऑफ खोपोली, अपोलो हॉस्पिटल – नेरूळ आणि सिव्हील हॉस्पिटल – रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीसअधिकारी व कर्मचारी, सुरक्षा रक्षक, टोल प्लाझा येथे काम करणारे कामगार आणि माहामार्गावर मेंटेनन्स करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवार 17.08.2023 रोजी करण्यात आले होते.

दैनंदीन कामाच्या धावपळीत सर्वांनाच वायू प्रदूषणास इतर शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागत जरी असले तरी त्यांना आरोग्य तपासणीसाठी वेळ काढता येत नाही म्हणूनच विशेषतः त्यांच्या फुफुसांची कार्यक्षमता तपासणी सह आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन खालापूर टोल प्लाझा येथे केले होते. या शिबिरात ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, बी. एम. आय. , डोळे तपासणी अश्या प्रकारच्या टेस्ट आणि शिबिरार्थीना तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणे डॉ. रवींद्र कुमार सिंगल – अप्पर पो. महासंचालक यांचे मार्गदर्शनाखाली, तानाजी चिखले – पो. अधीक्षक रायगड परिक्षेत्र, घनश्याम पलंगे – पो. उपाधीक्षक रायगड, श्रीमती गौरी मोरे – पो. नि. पनवेल विभाग, योगेश भोसले – स.पो.नि. बोरघाट आणि सर्व कर्मचारी वर्गाने शिबिराचा लाभ घेतला. आय आर बी टोल प्लाझाचे मॅनेजर बाळासाहेब लांडगे आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी देखील या शिबिरात सहभागी झाले होते. लायन्स क्लबच्या वतीने अध्यक्ष – अतिक खोत, उपाध्यक्ष – दीपेंद्र सिंग बदुरिया, सेक्रेटरी – दिपाली टेलर, ट्रेझरर – निजामुद्दीन जळगावकर, प्रोजेक्ट चेअरमन – अजय पिल्ले, अल्पेश शहा, संगीता पिल्ले, खेमंत टेलर, विकास नाईक यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page