खोपीली, प्रतिनिधी
महामार्गावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांचे वारंवार होणारे अपघात टाळण्याकरता अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे ऍक्टिव्ह सदस्य नंदकुमार ओसवाल यांच्या माध्यमातून जनावरांच्या गळ्यामध्ये रेडियमचा रिफ्लेक्टर बेल्ट लावण्याचे प्रयोजन येणाऱ्या काही दिवसात करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर 100 बेल्ट लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार असून, नंदकुमार ओसवाल यांनी या उपक्रमासाठी पुढकारघेतला आहे. मुक्या जनावरांचे अपघात टाळण्याकरता हा उपक्रम राबवला जाणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मोकाट फिरणारी गुरे रात्रीच्या अंधारात दिसून न आल्याने होणार्या अपघातांमध्ये अनेकदा गु्रांचा जीव जातं असतो. तर अपघातामध्ये वाहणाचे देखील नुकसान होऊन वाहनातील प्रवाशांना दुःखापत होऊन जीवितास देखील धोका निर्माण होतो. मात्र या रेडियम पट्टीमुळे अंधारातील गुरे वाहनाच्या लाईटवर दिसून येणार आहेत. ज्यामुळे अपघात टाळता येतील.