अलिबाग, अमूलकुमार जैन
आठवडाभर बोरेश्र्वरच्या मंदिरात विविध भजन मंडळांच्या भजनाच्या मैफिलिंचा सप्ताह असतो.ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नवेदर नवगाव येथील श्री बोरेश्वर महाराजांच्या सप्ताहा नंतर दुसऱ्या श्रावणी सोमवारी निघालेल्या श्री बोरेश्वर महाराजांच्या पालखीला भाविकांनी उपस्थिती लावली होती.
शिवशंभू चा गजर आणि हर हर महादेवगर्जना टाळ मृदुंगाचा गजर आणि गुलालाची उधळण अशा थाटात नवेदर नवगाव
येथील श्री बोरेश्वर महाराजांची पालखी सकाळी आठ वाजता निघाली होती.श्री बोरेश्वरमहाराजांच्या मंदिरात श्रावणाच्या सुरुवातीपासून महादेवाची आराधना केली जाते.जागृत देवस्थान असणाऱ्या श्री बोरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी श्रावणातच नव्हे तर एरव्ही देखील भाविक येत असतात.वर्ष भर मंदिरात रोज आरती होत असते.आरती साठी गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित असतात श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ही पालखी निघत असल्याने या पालखीला अनन्य साधारण महत्व असून या पालखीला तालुक्यातील भाविकांनी आपली हजेरी लावली होती.
नवेदर नवगाव येथे परंपरेनुसार यंदाही श्रावणातील सोमवारी श्री बोरेश्वराच्या मंदिरात सप्तहा बसला होता.या सप्ताहाला नवगावकरांसह अन्य परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून बोरेश्वराचे स्तुतिगान केले. नवगावकरांची बोरेश्वरावर श्रद्धा असल्याने आपल्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी उतरण्यापूर्वी ते बोरेश्वराला साकडे घालतात की हे बोरेश्र्वर महाराज आमचे रक्षण कर आमचा धंदा हा जीवावर उदार होऊन आम्ही करत असतो.असे साकडे घालून मग बोटी समुद्रात मासेमारीसाठी उतरवल्या जातात.
तसेच या पालखी सोबत गावातील सहा भजनी मंडळे व दोन महिला भजनी मंडळे देखील पालखी सोबत असतात. तसेच भाविकांना थिरकण्यास लावणारे नवगाव गावातील तीन बँड पथक होते या बँड पथकाचे विशेष म्हणजे या बँड पथकात तरुण मुलींचा सहभाग होता.मुली सुद्धा आता चांगल्या बँड वाजवतात.ह्या मुलींचा बँड पथक बघण्यासाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणत गर्दी जमा झाली होती. गुलालाच्या उधळणीत श्री बोरेश्वराची पालखी संपूर्ण नवगाव मध्ये फिरून पुन्हा बोरेश्वराच्या मंदिरात येऊन मंदिरात आरती झाली .अशा प्रकारे श्री बोरेश्र्वर महाराजांचा पालखी सोहळा संपन्न झाला.