अलिबाग, अमूलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील तक्रारदार यांच्या घरातील खंडित करण्यात आलेला विद्युत पुरवठा पूर्वरत कऱण्यासाठी लाच घेणाऱ्या लाचखोर यांच्यावर कारवाई करत असताना बाह्य स्त्रोत कर्मचारी, (कंत्राटी) याला ताब्यात घेतले तर सहाय्यक अभियंता फरार झाला आहे.
पेण तालुक्यातील तक्रारदार ह्यांच्या घराचा राहते घराचा खंडित केलेला वीज पुरवठा मीटर लावून पूर्ववत करणेकरिता भूषण बाळकृष्ण जाधव (वय 38 वर्षे, सहा. अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, पेण, रायगड (वर्ग 3) रा. प्रयाग कलश सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, उत्कर्ष नगर, पेण जिल्हा रायगड)यांनी 15,000/- रुपये लाचेची मागणी केली व सदरची लाचेची रक्कम तडजोडी अंती 10,000/-रुपये स्वीकारण्याचे मान्य करून सदरची रक्कम
योगेश दिलीप बाबर (वय 37 वर्षे, बाह्य स्त्रोत कर्मचारी, (कंत्राटी) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, पेण, रायगड रा. वडवली पोस्ट पोयनाड, अलिबाग, जिल्हा रायगड) यांचे कडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे बाह्यस्रोत कर्मचारी बाबर यांनी तक्रारदार यांचेकडून म.रा. वि.वि. कंपनी कार्यालय, पेण येथे आज दिनांक 28 ऑगस्ट2023 रोजी साडे चारच्या सुमारास 10,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून बाह्यस्रोत कर्मचारी बाबर यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. कर्मचारी बाबर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असल्याची माहिती सहा अभियंता भूषण बाळकृष्ण जाधव यांना मिळताच ते फरार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याचे लाचलुचपत विभागाकडून सांगण्यात आले आले आहे.