अलिबाग, अमूलकुमार जैन
गुजरात राज्यातून बडोदा येथून खडे,नक्षत्र आदी प्रकारच्या अंगठ्या विकण्यासाठी अलिबाग येथे आलेले संतोषभाई शिवा सलाट (वय ३५ वर्षे रा २२६ दत्तनगर, अजवारोड, अजवा तलावचे बाजूला वडोदरा ता. जि. वडोदरा ३९००१९ राज्य गुजरात),संजय शिवाभाई सलाट( वय १८ वर्षे रा २२६ दत्तनगर, अजवारोड, अजवा तलावचे बाजूला, वडोदरा ३९००१९ राज्य गुजरात),पप्पु धनाभाई सलाट (वय १७ वर्षे रा २२६ दत्तनगर, अजवारोड, अजवा तलावचे बाजूला, वडोदरा ता. जि. वडोदरा ३९००१९ राज्य गुजरात )यांच्या कडे काही सुजाण नागरिकांनी चौकशी केली असता त्यांची तारांबळ उडाली असल्याने त्यांच्यावर अधिक संशय बळावल्याने त्यांना अलिबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अलिबाग शहरातील चेंढरे बायपास परिसरात फकिराच्या वेशात येऊन नागरिकांची दिशाभूल करणायचा प्रयत्न तीन तरुण करीत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. यामुळे त्या तिन्ही तरुणांना नागरिकांनी हटकले. संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार अलिबाग बायपास येथे घडण्याअगोदर हे तीन संशयित तरुण चोंढी परिसरात फकिराच्या वेशात जाऊन आपले काम करत असताना तेथे देखील नागरिकांनी त्यांना हटकले होते. त्यावेळी या तिघांमधील दाढी असणारा संशयित तेथून पळून गेला होता. चेंढरे बायपास येथे आपल्या बोलबच्चनने या तरुणांनी आपल्या जवळील अंगठी विकण्यासाठीचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. हे तरुण फकिराच्या वेशात नागरिकांना फसविण्यासाठी आले आहेत. याचा अंदाज काही नागरिकांना आला. त्यांनी लगेचच या तरुणांची उलट तपासणी सुरु केली. त्यांच्या कडे असणारे साहित्य त्यांच्या झोळीतून बाहेर काढले. यामध्ये ग्रह, नक्षत्र आणि राशिचक्राच्या अंगठ्यांचा साठा आढळला. त्यांना त्यांची ओळख विचारली असता त्यांनी आम्ही गुजरात येथून आलो असल्याचे नागरिकांना सांगितले.
त्यांच्याकडे ओळख पत्र आणि नावे विचारली असता त्यांनी सांगितलेली नावे आणि त्यांनी ओळखपत्र असणारे आधार कार्ड यामध्ये विसंगती आढळून आली. यामुळे नागरिकांनी अलिबाग पोलीस ठाण्यात संपर्क केला. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले आणि या तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना तेथेच काही प्रश्न विचारले असता त्या तरुणांनी आमचे सहकारी माणगाव येथे आहेत असे सांगितले.
याबाबत अधिक माहिती घेतली असता संतोषभाई शिवा सलाट (वय ३५ वर्षे रा २२६ दत्तनगर, अजवारोड, अजवा तलावचे बाजूला वडोदरा ता. जि. वडोदरा ३९००१९ राज्य गुजरात),संजय शिवाभाई सलाट( वय १८ वर्षे रा २२६ दत्तनगर, अजवारोड, अजवा तलावचे बाजूला, वडोदरा ता जि वडोदरा ३९००१९ राज्य गुजरात),पप्पु धनाभाई सलाट (वय १७ वर्षे रा २२६ दत्तनगर, अजवारोड, अजवा तलावचे बाजूला, वडोदरा ता. जि. वडोदरा ३९००१९ राज्य गुजरात )हे तिघेजण बडोदा येथून दहा दिवसांपूर्वी ऐरणाकुरम एक्सप्रेसने पनवेल येथे कुटुंबासहित आले असून ते काही दिवस पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर असणाऱ्या मोकळ्या जागी राहिले होते.नंतर ते माणगाव येथे आले आणि त्यांनी त्यांचे बस्तान माणगाव येथील नदीकिनारी बसवले आहे.
आज सकाळी संतोषभाई शिवा सलाट आणि त्याचे दोन भाचे हे अंगठी विकण्यासाठी आज अलिबाग येथे आले असल्याचे अलिबाग पोलिसांना सांगितले. अलिबाग पोलिसांनी सांगितले की चौकशी साठी ताब्यात घेतलेल्या तिघांच्या नातेवाईक यांना माणगाव येथे बोलविण्यात आले असल्याचे सांगत नातेवाईक आल्यानन्तर त्यांच्याकडून खात्री झाल्यानंतर चौकशी साठी ताब्यात घेतलेल्या तिघांना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.