अलिबाग, अमूलकुमार जैन
मुरूड तालुक्यातील साळाव ते मुरूड ह्या रस्त्याचे काम निकृष्ट आणि बोगस काम केल्याने मुरूड तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी पूर्णतः पाठ फिरवली असल्याने येथील छोटे मोठे उद्योजक सहित नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.या रस्त्याच्या कामाची निविदा ही सात कोटी अठ्ठावीस लाख इतकीहोती.साळाव मुरूड रस्त्याचे पन्नास टक्के काम झाले असले तरी कंपनीने स्थानिक नागरिक यांच्यासहित येणाऱ्या पर्यटकांना रस्त्यामुळे हाल अपेष्टा सहन कराव्या लागण्यासाठी काम अर्धवट ठेवून रस्त्याचे देयक गिळंकृत केले आहे.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकामध्ये सुप्रभात कन्ट्रक्शन या कंपनीविरोधात चीड निर्माण झाली आहव.त्यामुळे सदर ठेकेदार कंपनीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, जिल्हा महिला संघटिका शुभांगी करडे,तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश घाटवळ, उपतालुका प्रमुख भगीरथ पाटील, भारत मोती,राजा चवरकर,चक्रधर ठाकूर ,अजय भोईर सहित तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.