अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या नराधमास पनवेल न्यायालयाने सुनावली जन्मठेप आणि पन्नास हजार रुपये दंड

अमूलकुमार जैन

रायगड जिल्ह्यातील उरण डाऊनगर येथील अल्पवयीन मुलीला जीवेठार मारण्याची धमकी देत बलात्कार करणाऱ्या आरोपी रमेश दादा कालेल यास पनवेल येथील सत्र न्यायालयाने आयुष्याकरिता जन्मठेप व ५० हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,उरण येथील डाऊनगर येथे दि. २९.१०.२०१८ रोजी तेरा वर्षीय अल्पवयीन पिडीतेस शाळेत जात असताना शेजारी राहणारा आरोपी रमेश दादा कालेल याने आवाज देवून त्याचे राहत्या घरात बोलवून, तिला जीवे ठार मारण्याची धमकी देवून, जबरदस्तीने बलात्कार करणा-या आरोपी रमेश दादा कालेल याचे विरुद्ध तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून उरण पोलीस ठाण येथे गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सदर गुन्हा हा सत्र न्यायालयात दाखल केला असता त्यावर सुनावणीअंती पनवेल येथील सत्र न्यायालयात आरोपी यास भा. दं. वि. कलम ३६३, ३४२,३७६ (२) (आय) (एन), ५०६ व पोक्सो कलम कायदा ५(एल), ६ खाली दोषी धरून उर्वरित सर्व आयुष्याकरिता जन्मठेप व ५० हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की,आरोपी रमेश दादा कालेल,( वय २२ वर्षे,) याने २९/१०/२०१८ रोजी अल्पवयीन पिडीता शाळेत जात असताना शेजारी राहणा-या आरोपीने तिला आवाज देवून त्याचे राहते घरात बोलावून घेतले व दरवाजा आतून बंद करून पिडीतेला जिवे ठार मारण्याची धमकी देवून तीनवेळा जबरदस्तीने शरीरसंबंध केले व तिला दि. ३०/१०/२०१८ रोजीच्या पहाटेपर्यंत घरात डांबून ठेवले. अल्पवयीन पिडीतेने ओरडण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबून ठेवले. अल्पवयीन पिडीतेला दुस-या दिवशी पहाटे आरोपीने घरामधुन सोडले व झालेला प्रकार घरी सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. पिडीता पहाटे घरी आल्यानंतर तिने आईला सदर प्रकाराबाबत सांगितले. त्यानंतर पिडीतेच्या आईने अल्पवयीन पिडीतेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीविरूध्द भा. दं. वि. कलम ३६३, ३४२. ३७६ (२) (आय) (एन), ५०६ व पोक्सो कलम कायदा ४, ६, ८, १२ अन्वये उरण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता.
सदरच्या खटल्याची सुनावणी सहा. अति सत्र न्यायाधीश शाइदा शेख सोा. यांचे न्यायालयात झाली. या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता, अॅड. प्रतिक्षा वडे वारंगे यांनी एकुण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. सदर केसमध्ये पिडीत मुलीची आई, पिडीत मुलगी तसेच वैद्यकीय अधिकारी आणि तपासिक अमलदार यांची साक्ष मुलीची आई, पिडीत मुलगी तसेच वैद्यकीय अधिकारी आणि तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. तपासिक अंमलदार के. एन. शिरोळे, पोलीस उपनिरीक्षक, उरण पोलीस ठाणे व रूपाली चौधरी, पोलीस उपनिरीक्षक, उरण पोलीस ठाणे यांचा तपास महत्वाचा ठरला तसेच पैरवी पोलीस शिपाई गायकर व पोलीस शिपाई राजेंद्र बर्गे यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता, अँड. प्रतिक्षा वडे वारंगे यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद आणि दाखल केलेले न्यायनिर्णयः ग्राहय धरून मा. सहा अति सत्र न्यायाधीश शाइदा शेख सोो. यांनी दि. २९.०८.२०२३ रोजी आरोपी रमेश दादा कालेल यास भा. द. वि. कलम ३६३.३४२, ३७६ (२) (आय) (एन),५०६ व पोक्सो कलम कायदा ५(एल), ६ खाली दोषी धरून जन्मठेप व ५० हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या घटनेच्या निर्णयामुळे यापुढे जो अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करेल अशांना न्यायालय जन्मठेपेची शिक्षा देईल असा संदेश संपूर्ण जनतेस गेलेला आहे व या न्यायनिर्णयाचे स्वागत स्थानिक नागरिक करित असल्याचे विशेष सरकारी अभियोक्ता, अँड. प्रतिक्षा वडे वारंगे यांनी सांगितले

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page