उरण, प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर आर्ट्स सायन्स व कॉमर्स महाविद्यालय, महालण विभाग, फुंडे च्या प्राणिशास्त्र विभाग च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान घेण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख वीर वाजेकर कॉलेचे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ आमोद ठक्कर ह्यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी आपल्या परिसरात मोठया प्रमाणात होत असलेल्या अपघातातील निधन आपण रस्ता सुरक्षेचे नियम पाळले तर टाळू शकतो.
प्रमुख पाहुणे श्री मुजावर जि. एम वरिष्ठ पोलिस निरीक्षक ट्रॅफिक न्हावा शेवा पोलीस स्टेशन ह्यांनी रस्ता सुरक्षा मार्गदर्शन करताना विद्यार्थांनी दुचाकी चालवताना हेल्मेट चा वापर करावा, मोटारसायकल चालवताना ट्रिपल सीट चालवू नये, वाहन चालवताना मोबाईल चा वापर करू नये,मोटारसायकल चालवणारी व्यक्ती कमीत कमी १८ वर्ष पूर्ण झालेली असावी, वाहन चालवताना आपली स्वतःची काळजी घ्यावी, उगीच धोकादायक रित्या वाहन चालवू नये, मद्यपान किंवा नशा करून वाहन चालवू नये, वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन महामार्गावरील दिलेल्या सूचना व चिन्हांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. अपघातात केवळ तुम्ही जखमी होता असे नाही संपूर्ण कुटुंबाला त्याचे परिणाम भोगावे लागतात वाहनाची नासधूस होते औषधपचारात प्रचंड आर्थिक नुकसान होते आणि तुमची चूक असली तर इन्शुरन्स मिळत नाही त्यामुळे तरुणांनी वाहतुकीचे नियम पाळावेत व सुरक्षित प्रवास करावा. ह्या वेळेस त्यांनी विद्यार्थांनी व्यसन, सोशल मीडिया व सायबर क्राईम ची अनेक उदाहरणे देऊन तरुणांनी विषेतः महाविद्यालयीन तरुणांनी त्यापासून कसे लांब राहणे आवश्यक आहे हे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मा प्राचार्य डॉ पी जी पवार ह्यांनी तरुणांनी शिस्तबद्ध जीवन जगले पाहिजे व आपल्या मनावर ताबा ठेवला पाहिजे. आपल्या महाविद्यल्यातील प्रत्येक विद्यार्थी हेल्मेट घालूनच वाहन चालवताना दिसला पाहिजे व आपल्याला वाहन देणारे आपले पालक आपली घरी वाट पाहत आहेत ह्याची जाणीव ठेवावी असे आवाहन केले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ विलास महाले, हेड कॉन्स्टेबल श्री कदम व श्री पाटील उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा पंकज भोये ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ राहुल पाटील ह्यांनी केले. डॉ जावळे आर एस आणि डॉ श्रेया पाटील ह्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले