उरण, प्रतिनिधी
उरण तालुक्यातील करंजा गावामध्ये सोन्याच्या प्रतिकात्मक नाराळाची मिरवणूक काढून, नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला.
द्रोणागिरी हायस्कुल परंपरागत नारळी पौर्णिमेचा उत्सव गेली अनेक वर्षे साजरा करत आहे. वाजत गाजत सोन्याच्या नारळाची मिरवणूक काढून, हा नारळ समुद्राला अर्पण केला जातो. यावेळी शाळेचा शिक्षक वृंद, विद्यार्थी, गावातील महत्वाच्या व्यक्ती, ग्रामस्थ उपस्थित असतात. यंदाही अशाचप्रकारे सोन्याच्या नारळाचे अर्पण समुद्र देवतेला करण्यात आले. यावेळी समूद्रावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांना बरकत आणि मासेमारांना सुरक्षित ठेवण्यासाठी गाऱ्हाण मंडण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकात्मक नाराळाची यथासांग पूजा अर्चा करून, गावामधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थाननी या नाराळाचे पूजन करून, मिरवणूकिमध्ये सहभाग दर्शवला.