आक्षी किनारी सापडले अमली पदार्थाचे सहा पाकिटे

अलिबाग, अमूलकुमार जैन

रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या आक्षी समुद्र किनारी अमली पदार्थाचे सहा आक्षी ६ पाकिटे सापडले असून त्याचे वजन
६.८३३ किलो इतके आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग तालुक्यातील आक्षी गावच्या समुद्र किनारी मिळून आलेली प्लास्टिक पिशवीची पाकिटे त्यावर समोरील बाजूस मध्यभागी गोल आकारात गरुडाचे व नागाचे चिन्ह व त्याच्या बाजूला इंग्रजीमध्ये असे लिहिलेलेव्ही त्याचे खाली इंग्रजी मध्ये AFGHAN PRODUCT असे लिहिलेले दिसत होतेव सदर पाकिटावर उर्दू लिपीमध्ये छापील अक्षरे असलेली तसेच वरील प्लास्टिक चे आवरणाच्या आत मध्ये नक्षीदार प्लास्टिक आवरण पाकीट असलेले व सदर पाकिटावर इंग्रजीमध्ये LIMITED EDITION व STARBUCKS HOLIDAY BLEND एकूण नऊ प्लास्टिक पिशवीची पाकिटे व काही फाटलेल्या पाकिटमधून बाहेर येऊन तुकडे पडून वाळूमध्ये पसरलेला हिरवट काळसर रंगाचा पदार्थ असा ६.८३३कि.ग्रॅम वजनाचे सहा पाकिटे मिळून आला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page