ग्रामपंचायत स्तरावर स्पोर्ट्स कॉम्प्लेस काळाची गरज

अलिबाग, अमूलकुमार जैन

रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डी, क्रीकेट या खेळातून असंख्य खेळाडू तयार झाले आहेत. हा खेळ राज्य, देशपातळीवर पोहचला आहे. शेकापच्या माध्यमातून नागाव, वेश्‍वी या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले आहेत. खेळाडूंना ऑलंपिकपर्यंत पोहचण्यासाठीअ‍ॅथेलेटिक्स खेळात प्रगती करणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होणे काळाची गरज आहे. गावागावातून खेळाडू तयार झाले पाहिजे, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले.

आंबेपूर – बांधण या ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट बांधण्यात आले आहे. या कोर्टचा उद्घाटन सोहळा गुरुवारी ( 31 ऑगस्ट ) रोजी आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते.

बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी ☝️☝️☝️येथे क्लिक करा

उद्घाटनसोहळ्या प्रसंगी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील म्हणाले माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्यासारखे अनेक मंडळींनी विधीमंडळात आमदार म्हणून अलिबागची शान राखली आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या आमदारांनी विधीमंडळात खारेपाटातील उंची कायम टीकून ठेवली आहे.
आदीवासीवाड्यांपर्यंत काँक्रीट रस्ता झाला पाहिजे. आदीवासी समाजाची गैरसोय होऊ नये यासाठी अधिवेशनात प्रश्‍न मांडणार आहे. घसवड येथे सुसज्ज असे मासळी बाजारपेठ उभी केली जाणार आहे. पाऊस संपल्यावर त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. या बाजारपेठेचा डीपीआर तयार झाला आहे. वडखळ ते अलिबाग हा दुपरी रस्ता लवकरच होणार आहे. डीपी प्लॅन तयार झाला आहे.
पांडवादेवी ते पेझारी पर्यंत पुल बांधण्याचा एक प्रयत्न आहे त्याचे नियोजन करण्यात आले आहे ही कामे शेकापच्या माध्यमातून मंजूर केली आहेत. विकास कामे करीत असताना कधी टक्केवारी मागितली नाही. जे बोगस कामे करीत आहेत त्यांना वठणीवर आणण्याचे काम केले जाणार आहे. राज्याच्या बजेटपेक्षा अधिक कामे केली जात आहेत. निवडणूका समोर ठेवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. हे धोरण चुकीचे आहे. आगामी अर्थसंकल्पात याबाबत आवाज उठवून सरकारच्या ही बाबत निदर्शनास आणून देणार.
विधीमंडळात चांगले लोकप्रतिनिधी बसले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासून कामाला लागा.
पुढे जयंत पाटील यांनी सांगितले. चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने बांधण याठिकाणी चांगले बॅडमिंटन कोर्ट बांधले आहे. त्याची देखभाल दुरुस्ती योग्य पध्दतीने होणे आवश्यक आहे. त्याठिकाणी सुविधा उपलब्ध करून खेळाडूंना घडविण्याचे काम केले पाहिजे. भविष्यात ग्रामपंचायत स्तरावर अ‍ॅथेलेटिक्सच्या बाबतीत काम करणार आहे. खेळातून सर्व स्तरातील घटक एकत्र येतात. चर्चा होते. यातूनच विविध प्रकारची कामे केली जाताता. स्पोर्ट्स कॉम्लेक्समुळे गावाचा एकीपणा टीकून राहतो. त्यापध्दतीने गावागावात क्रीडा संकुल उभारून येथील तरुणांना हक्काचे व्यासपिठ होणे गरजेचे आहे. गावाच्या विकासासाठी काम करीत असताना केंद्रबिंद कधीच विसरू नये. तरुणांना इतिहास समजला पाहिजे त्यापध्दतीने कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page