मटक्याच्या जुगाराने अनेकांना केले उध्वस्त ; पोलीस कारवाईची गरज

अलिबाग, अमूलकुमार जैन

मटक्याच्या या जुगाराने अनेकांचे संसार उध्वस्त केले असून लवकर श्रीमंत होण्याच्या या शाॅर्टकटने अनेकांना देशोधडीला लावले आहे. हा मटका आता अनेक युवक, कामगार वर्ग, रोजनदारीवर काम करणारा छोटा मजूर, व्यापारी (छोट्यात छोटे) यांचे मूळ व्यसन बनत आहे.

शेतात आलेला माल विकण्यासाठी तालुक्यात गावा-गावातुन आलेला शेतकरी वर्ग विकलेल्या मालाचे सर्व पैसे मटका जुगारामध्ये टाकून जात आहे. तर शहरातील विविध कामे करणारे कामगार हे आपली मेहनतीची कमाई त्या ठिकाणी आजमावत आहेत. हा मटका जुगार घेणारे त्यांना प्रोत्साहन करत आहेत का ? आकडे लावणाऱ्या लोकांचे टोळके देखील या मटका अड्ड्याच्या ठिकाणी फिरत असताना दिसत आहेत. मटका जुगार खेळणाऱ्या बुकी कडून दिवस भरात लाखो रूपयांची उधळपट्टी होताना दिसत आहे. यामध्ये सर्वात जास्त फोन (ऑनलाईन) मटका चालविला जात आहे. फोन मार्फ़त आकडे लावणे आणि फोनवरच पैश्याची बोली लावणे असे प्रकार चालू आहेत. या प्रकाराने आत्तापर्यंत अनेक लोकांचे जीवन उध्वस्त झाल आहे.असे असतानाही कोणतीच कारवाई होत नसल्याने, मटका जुगार मालक व चालकांचे स्थानिक पोलिसांसोबत लागेबंधे असल्याचे म्हटले जात आहे. म्हणूनच मटका जुगार मुक्तपणे शहरामध्ये चालु आहे, अशी शंका रायगडच्या जनतेला व्यक्त करत आहे. या विषयाची स्थानिक पोलिस प्रशासनाला कल्पना असून देखील पोलिस प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचे दिसून येत आहे. मटका जुगाराला खलेआम उधाण आल्याचे चित्र अलिबाग तालुक्यासहित जिल्ह्याच्या विविध ठिकाणी दिसून येत आहे. यावर त्वरित प्रतिबंधक कार्यवाहीसाठी पोलिस प्रशासना कडून पाऊले उचलण्याकरिता प्रयत्न आवश्यक आहेत.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरामध्ये बसस्टँड, छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर चौक ,भाजी मार्केट, रिक्षा स्टँड,अलिबाग रेवदंडा रोड येथे असणाऱ्या जकात नाका नजीक,जुनी भाजी मार्केट, पोलीस वसाहत या भागांत खुलेआम मटका जुगारांचे छुपे अड्डे तयार झाले आहेत. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात सुद्धा विविध ठिकाणी मटका जुगार फोफावत चालला आहे. फोन मटका तसेच मटका जुगारांचे अन्य ही प्रकार खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कामगारांना मटका खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या बुकिंकडून लाखों रूपयांची उलाढाल होताना आहेत. पोलीस विभागाकडून नाममात्र कारवाया झाल्या , मात्र जी ठोस कारवाई होणे गरजेचे होते. ते आजही झाले नसल्याने, या प्रकाराला आळा बसणे कठीण झाले आहे. तरी मटक्यावर प्रतिबंधत्मक कारवाई करून, अशाप्रकारचे तयार झालेले अड्डे उध्वस्थ करण्याची मागणी आता जिल्ह्याभरातून होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page