अलिबाग, अमूलकुमार जैन
संस्थांमध्ये शेतकरी वर्गाला केंद्रस्थानी ठेवून संस्थांनी काम केले पाहिजे. संस्थेच्या सभासदाचे हित जपणे, हे संस्थेचे आद्यकर्तव्य आहे, असे प्रतिपादन कोर्लई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,कोर्लई चे संस्थापक रेव्ह.फा.रुडॉल्फ अंड्राडीस यांनी संस्थेच्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले.
यावेळी संस्थेचे कोर्लई येथील माउंट कार्मेर्ल चर्चचे धर्मगुरू फादर रेव्ह.बोणावेंचर नुनिस,वसई येथील फादर मायकल,अध्यक्ष मार्सेलीन रुझार,उपाध्यक्ष फ्रान्सिस डिसोझा,ऑन. सेक्रेटरी सिमोन वेगस,संचालक ज्यांव रुझारियो,डॉमनिक पेन्हाअनिल पेंय,राफाएल वेगस,सुनिल चवरकर,वैभव कोटकर,कोर्लई सरपंच राजश्री मिसाळ,मरिना मार्तीस,दुमनिका वेगस,व्यवस्थापक लॉरेन्स वालेर वेगस आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी रेव्ह.फादर रुडॉल्फ यांनी सांगितले की,सत्तावीस वर्षांपूर्वी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली पतसंस्थेच्या रूपाने लावलेले छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.संस्थेची पहिली सभा ही ह्या सभागृहात झाली होती.शंभर सभासद आवश्यक होती.त्यावेळी तीन ते चार महिने लागले.गावातील तसेच परिसरातील जनतेने त्यावेळी मोलाचे सहकार्य केले त्यामुळे आज पतसंस्था ही अत्तावीस वर्षे पूर्ण केले आहे.दिलेले कर्ज वसूल करणे हे काम बँकेचे कर्मचारी हे चोख बजावत आहे.जो विश्वास ठेवला आहे तोच विश्वास यापुढेही ठेवाल असा विश्वास व्यक्त केले.
यावेळी कोर्लई येथील माउंट कार्मेर्ल चर्चचे धर्मगुरू फादर रेव्ह.बोणावेंचर नुनिस यांनी सांगितले की,आपली सभासद संख्या ही वाढविणे गरजेचे आहे.आर्थिक दृष्ट्या सबळ होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.आपण आपल्या घरातील लहान मुलांना आर्थिक बचतीचे सवय लावावी जेणे करून त्यांना भविष्याची तरतूद कशाप्रकारे करावे याची माहिती होणे सुलभ होईल.इमारती साठी लाभांशमधून काही भाग दिला तर भविष्यात ही इमारत सुसज्ज होईल यात शंका नाही.शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करीत पतसंस्था ही ग्राहकांना सेवा देत आहे.तज्ञाचे मार्गदर्शनाखाली पतसंस्थेचे कामकाज सुरू आहेत.या संस्थेने कर्जावरील व्याज हे उद्दिष्ट न ठेवता लोकांना संस्थेमुळे कशाप्रकारे फायदा होईल यासाठी प्रयत्न केले आहे.
यावेळी संस्थेच्या सभासदांच्या ज्या दहावी आणि बारावी मध्ये साठ टक्के अथवा अधिक गुण मिळविलेल्या पाल्याचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मार्सेलीन रुझार यांनी सांगितले की,कोलई ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्थेने आजपर्यंत २८ वर्षाची व्यवसायाची कटिबध्दता राखत सहकारातील कार्याची अखंडता कायम राखली आहे.आजमितीस संस्थेचे २५५२ सभासद आहेत.संस्थेचे वसुली भागभांडवल हे ९७ लाख २०हजार ५४५आणि ५४ पैसे इतके झाले आहे.संस्थेच्या ठेवी पाच कोटी२४लाख १६ हजार ५८६ आणि पैसे ३४ आहेत .तर ३ कोटी६७ लाख ८२हजार ४७३ इतके असून त्यापैकी एक कोटी ३१ लाख ९०हजार ३९० इतके वसूल झाले आहे. आर्थिक क्षेत्रात कमालीची स्पर्धात्मक परिस्थिती असूनही स्थापनेपासूनची ऑडीट वर्ग “ब” ची परंपरा कायम राखली आहे. बँकिंग क्षेत्रातील सध्याची आव्हाने व ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता बँकाप्रमाणेच वेगवेगळया सेवा संस्थेने ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेचे एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे मार्च २०२३ अखेर संस्थेला ७लाख ९४ हजार ९३३ आणि ८८पैसे नफा झाला आहे. संस्थेला सतत प्रगतीपथावर ठेवण्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हातभार लगला आहे या सर्व सभासद ग्राहकांचे व सर्व कर्मचा-यांचे त्यांनी आभार मानले.
सर्वसाधारण सभेत काही सभासदांनी विचारणा केली की,संस्थेच्या कर्मचारी यांच्या पगार कशाप्रकारे दिला जातो असा प्रश्न उपस्थित झाला असता संस्थेचे अध्यक्ष मार्सेलीन रुझार यांनी सांगितले की,
पगार वाढ ही दर तीन वर्षांमध्ये केली जाते.ज्या सभासदांना शंका असेल त्यांनी संस्थेच्या कार्यालयीन वेळेत यावे म्हणजे शंका निरसन करण्यात येईल.
संस्थेचे सनदी लेखापाल पी. जी रानडे अँड कंपनी सभासदांनी संस्थेला पॅन कार्ड द्यावे अशी सूचना केली आहे.त्याचप्रमाणे सुवर्ण तारण कर्जाची मुदत सरसकट एक वर्षे होती त्यामध्ये दुरुस्ती करीत सुवर्ण तारण कर्जाची मुदत रु.50000/- पर्यत एक वर्षे रु.50000/- च्या वरील रक्कमेस तीन वर्षे मुदत द्यावी कारण कर्ज फेडीचे हप्ते फेड करणे सुलभ होणार आहे.संस्थेच्या मयत सभासदांच्या वारसांना अल्पशी आर्थिक मदत म्हणून संस्था मृत्यूजयं
जय निधी योजना राबविण्यात येत आहे.त्याला सभासदांनी सहकार्य करण्याचे आव्हान संस्थेच्या वतीने व्यवस्थापक लॉरेन्स वालेर वेगस यांनी करण्यात आले.अहवाल वाचन व्यवस्थापक लॉरेन्स वेगस यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे व्हाईस चेअरम फ्रान्सिस डिसोझा यांनी केले.