उरण, प्रतिनिधी
मा. सर्वोच्च न्यायालयाची संकल्पना व निर्देशानुसार रायगड जिल्हा व इतर ठीकाणच्या न्यायालयातील कारभार पेपरलेस करण्याचे ठरले आहे. त्यानुसार दि.४ /९/२०२३ रोजी उरण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये ई-फाईलींग अँड फॅसीलीटी कार्यप्रणालीचे उद्घाटन मा. प्रमुख न्यायाधीश बडे साहेब तसेच न्यायाधीश वाली साहेब यांचे हस्ते करण्यात आले.
त्यावेळी उरण वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. दत्तात्रेय नवाळे यांनी सांगीतले की सदरची ई-फायलींग अँड फॅसीलीटी सेवा वकील व पक्षकार या दोन्हीसाठी उपयोगी पडणार असुन आत्ता दाखल होणारी नवीन प्रकरणे ( खटले, दावे) ऑनलाईन पध्दतीने दाखल करावी लागतील. यासाठी लागणारे साहीत्य जसे संगणक, स्कॅनर, प्रिंटर, वेब कॅमेरा व इतर उपकरणे बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र व गोवा यांजकडुन पुरवण्यात आली आहेत. तसेच या ई-फायलींग अँड फॅसीलीटी सुवीधा केंद्रात वकील व पक्षकार यांचे मदती करीता संगणक परीचालकाची सुध्दा नियुक्ती करण्यात येणार आहे. ई- फायलींगचे काम वाजवी दरात करणार येणार आहे असेही अँड दत्तात्रेय नवाळे यांनी सांगीतले.
सदरचे वेळी जेष्ठ वकील अॅड. एम. एम. मोकल, अॅड. विजय पाटील, अॅड. पराग म्हात्रे, अॅड प्रसाद पाटील व अॅड. किशोर ठाकुर, अॅड. सागर कडु, अॅड. संतोष पाटील वगैरे वकील मंडळी हजर होती.