अलिबाग, अमूलकुमार जैन
रायगडातील गोविंदा पथकांना गुरुवार(दि.7) साजर्या होणार्या दहीहंडीचे वेध लागले आहेत. दहीहंडी हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी कंबर कसली आहे. रायगड पोलीस अधिक्षकांच्या हद्दीत 1863सार्वजनिक तर 6330 खासगी अशा एकूण 8193 हंड्या फुटणार आहेत.
आगामी दहीहंडीसाठी रायगड जिल्ह्यातील चोवीस ठिकाणी लाखांहून अधिक रककमेच्या चौदा दहीहंड्या तर पन्नास हजारांहुन अधिक रकमेच्याब दहा दहीहंड्या अशा चोवीस मंडळाकडून पारितोषिक काच्या दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत.
त्यामुळे गुरुवारी साजर्या होणार्या दहीहंडी सोहळ्यात गोविंदा पथकांचा जोर दिसून येणार आहे.
अलिबागसह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दहीहंड्या लावल्या जाणार आहेत. त्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. मानाच्या दहीहंड्या फोडण्याबरोबरच लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाटी गोविंदा पथकांनीही कंबर कसली आहे. यासाठी गेले महिनाभर पथकातील खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत. रायगड पोलीस दलाकडून दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रायगडात 1863 सार्वजनिक तर 6330 खासगी अशा एकूण 8193 दहीहंड्या बांधल्या जाणार आहेत. तर 176 सार्वजनिक मिरवणुका निघणार असून त्यातील 30 मिरवणुका ह्या मशीद,मोहल्ला, दर्गा समोरून निघणार आहेत.
यावर्षी दहीहंडीच्या कार्यक्रमात अलिबाग शहरासह चेंढरे, सुडकोली, पेझारी, ढोलपाडा, नेहूली, गोंधळपाडा, मुळे, मेटपाडा, आक्षी, बहीरीचापाडा, पेढांबे, बांधण, बामणसुरे, गवळीवाडी वेश्वी, सहाणगोठी, कोळीवाडा अलिबाग, कुरुळ, मानी, किहीम आदी शहरी व ग्रामीण भागातील एकूण 50 गोविंदा पथकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यात 22 महिला गोविंदा पथक व 28 पुरुष गोविंदा पथकांचा समावेश आहे. सलामीची दहीहंडी पुरुष गटासाठी पाच थरांची तर महिला गटासाठी चार थरांची असणार आहे. सलामीची दहहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला 15 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. अंतिम सामन्यात सात थरांची दहीहंडी फोडणाऱ्या पुरुष गटातील गोविंदा पथकासाठी एक लाख 21 हजार 111 रुपयाच्या बक्षीसासह गदा देऊन विजेत्या गोविंदा पथकाचा सन्मान केला जाणार आहे. ही स्पर्धा अलिबाग शहरापुरतीच मर्यादित आहे. तर दहीहंडी स्पर्धा अलिबाग तालुक्यापुरती मर्यादित असल्याचे आयोजक माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यात अलिबाग येथील शेतकरी भवन येथे (रु.एक लाख एकवीस हजार),स्टेट बँक समोर मदर बेकरी येथे बीजेपी कार्यालया समोर (रु.एक लाख 51 हजार) छत्रपती शिवाजी महाराज चौक (रु.एक लाख 51हजार 111),पेण शहरात श्री. ललित पाटील मित्र मंडळ पेण नगरपालीका समोर कोतवाल चौक(रु.एक लाख) गांधी मंदीर चे समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (रु.एक लाख अकरा हजार),
संदिपदादा ठाकुर फांउडेशन पेण (रु.एक लाख),पेण तालुक्यातील वाशी नाका(रु.51 हजार),युगंधर सामाजिक संस्था वडखळ (रु.51 हजार),भरतशेठ गोगावले मित्र मंडळ महाड बँक ऑफ बडोदासमोर महाड (रु.51 हजार),महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित दहिहंडी, लायन्सक्लब महाड (रु.51 हजार),प्रतिक प्रतिष्ठान, ठिकाण- राजमाता जिजाई मैदान गोरेगांव (रु.पन्नास हजार),आमदार महेंद्र शेठ थोरवे प्रतिष्ठान (रु.एक लाख अकरा हजार),
रॉयल गार्डन हॉटेल शेजारी श्रीमती माधवी जोशी चार फाटा (रु.एक लाख एकवीस हजार 902),टोकरे फांउडेशन( रु.1लाख 31हजार),काशी होम प्रायव्हेट लिमिटेड, ठिकाण गुरुव्दारा समोर, शास्त्रीनगर (रु.एक लाख),आमदार महेंद्र थोरवे समर्थक, मोगलवाडी खोपोली (रु.एक लाख),शिवसेना नागोठणे शहर शाखा(रु.पंचावन्न हजार)छत्रपती शिवाजी महाराज चौक नागोठणे शिवाजी चौक पाली जिल्हास्तरीय (रु.एक लाख अकरा हजार),सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठाण तर्फे आयोजित जेष्ठ नागरिक सभागृह टाउन हॉल रोहा (रु.दोन लाख),पोयनाड येथील भैरवनाथ युवक मंडळ ,पेझारी (रु.एक लाख अकरा हजार) आदी मोठ्या रककमेच्या दहीहंड्या आहेत.यासाठी
पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दल(होमगार्ड)असे एकूण 127 जणांची बंदोबस्त ठेवण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
गोपाळकाला निमित्त जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसआरपीएफ एक प्लाटून,आर.सी.पी प्लाटून दोन,स्ट्रायकिंग फोर्स पाच,१ अ.पो. अधीक्षक, ८ उप विभा.पो. अधिकारी, १२३ पो. अधिकारी, १३०० पो.अंमलदार,होमगार्ड ३५० आदीचा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलील अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.