शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त माजी शिक्षकांचा सत्कार

प्रतिनिधी, अमूलकुमार जैन

स्व.प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंच तसेच प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय अलिबाग तर्फे रामनारायण पत्रकार भवनात शिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेला डॉ. चंद्रकांत वाजे , जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार,मंचाचे अध्यक्ष सखाराम पवार ,नागेश कुळकर्णी, श्रीरंग घरत,तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच ग्रंथालय प्रदर्शनाचे डॉ. चंद्रकांत वाजे यांच्या शुभहस्ते फित कापून ग्रंथ व पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंचाचे अध्यक्ष सखाराम आण्णा पवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार आणि डॉ.चंद्रकांत वाजे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदु तळकर यांनी केले. या प्रास्ताविकात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती उपस्थितांना सांगितले. तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंनत देवघरकर आणि सौ.वैशालीताई पुरुषोत्तम भिडे यांचा सांस्कृतिक मंचाच्या वतीने तसेच प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच त्याचवेळी अलिबाग जेष्ठ नागरिक संस्थेवर नवनिर्वाचित कार्यकारणी पदाधिकारी व संचालकपदी नियुक्त सदस्य म्हणून मंचाचे सदस्य सौ.चारुशीला शरद कोरडे, गजेंद्र दळी, माजी नगरसेवक आर.के.घरत ,नंदु तळकर, राजाराम भगत आदी मान्यवरांचा नवनिर्वाचित सदस्य म्हणून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमुर्ती अनंत देवघकरसर व वैशालीताई भिडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी देवघरकर सरांनी आपल्या कवितेतून आठवणींना उजाळा दिला. शाळेतील आठवणींना उजाळा देणारी “आठवणीतील शाळा” ही कविता सादर केली.
तर वैशाली भिडे मँडम यांनी सदर पुरस्कार आपल्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित केला. तसेच सेवानिवृत्त झाल्यावर सुध्दा स्व.प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंच व प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय यांनी सत्कार केल्याबद्दल आभार मानले. तर डाॅ.वाजे यांनी देखील कवितेतून आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी विद्यार्थी जयचंद्र काठे, नंदु तळकर, हेमंत महाले, विकास म्हात्रे, उल्हास पवार यांनी आपल्या शिक्षकांप्रति आदरभाव याप्रसंगी व्यक्त केला.
माजी मुख्याध्यापक अनंत देवघरकर यांची नात कु. वैभवी देवघरकर हिने इंजिनिअरिंग मध्ये प्राविण्य संपादन करून पुढील शिक्षणासाठी जर्मनीत रवाना होणार आहे.यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमप्रसंगी वर्षा दिवेकर, छाया जोशी, रसिका वाजे, जेष्ठ नाट्यकर्मी जगदीश नागे,अँड.राजेंद्र जैन, भालचंद्र वर्तक,विकास पाटील,उमेश करंबत, हेमकांत सोनार ,ग्रंथपाल ज्योती म्हात्रे, झेबा कुरेशी तसेच अलिबाग प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रकाश सोनावडेकर, रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष भारत रांजणकर,जेष्ठ पत्रकार तसेच दै.प्रहारचे सुभाष म्हात्रे, दै.लोकसत्ताचे हर्षद कशाळकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थितांचे आभार पोलीस पाटील संघटनेचे विकास पाटील यांनी मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page