जेएनपीटी चार गावांना स्काय वॉक ब्रीज देणार

प्रतिनिधी, अजय शिवकर

जेएनपीटी बंदर वसल्यानंतर, जेएनपीटी हद्दीतील एकसंघ राहिलेली जसखार करळ-सावरखार, सोनारी या चार गावांना जेएनपीटीने रेल्वे लाईन,ब्रीज आणि आठ पदरी रस्त्यामुळे एमेकांपासून वेगळे पाडले.चार गावांमध्ये तीन मिनिटांत जाण्यास लागणारा वेळ वाहनाने १० मिनिटांचा आणि चालत अर्ध्या तासाचा झाला आहे. हा दररोजचा त्रास हजारों प्रवाशी तीस वर्षे सहन करीत आले आहेत. ग्रामस्थ, पत्रकार, सरपंच यांनीही हा प्रश्न वारंवार मांडला असून,सदरचा प्रश्न आणि त्रास आजही कायम राहिला आहे.

सातत्याने होणारा पाठपुरावा आणि नागरिकांची गैरसोय पाहता, जेएनपीटी प्रशासनाने स्काय वॉक ब्रीज सल्लागार कमिटी स्थापन केली असल्याचे समजते. ब्रीज संबंधी अहवाल जेएनपीटीला सल्लागार, स्थानिक सरपंच, अध्यक्ष इत्यादी कडून हवे आहेत. आता होऊ घातलेल्या रामासाठी स्थानिक पदाधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. जेएनपीटी प्रशासन येथील गावांचा एकमेकांशी तुटलेला संपर्क पुन्हा जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहे. तर सध्या अशा प्रकारची व्यवस्था नसल्याने नागरिकांना अथवा चारमान्यांना रस्ता ओलांडून जावे आगत आहे. यामुले अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागते. तर अशा अपघातांमधून अनेकांना जीव देखी गमवावे लागले आहेत. याच सर्वाचा विचार करून गेली अनेक वर्षे अशा प्रकारच्या ब्रिजची मागणी केली जात होती. होणाऱ्या या ब्रिजमुरे अपघातांची संख्या कमी होणार असून, येथील गावांचा एकमेशी पुन्हा संपर्क होणार आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page