मुरूड जंजिरा, अमूलकुमार जैन
मुरुड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाच्या विद्यमान कार्यकारणीने एकाच विशिष्ठ व्यापाऱ्यास बोलावून ४० ते ५० टन कोणतीही निविदा प्रक्रिया न करता असणारी सुपारी कमी भावात विकल्याने आज सुपारी संघाच्या शेकडो सभासदांना समाधानकारक भाव मिळू शकलेला नाही.खुल्या निविदा प्रक्रियेची पद्धत डावलून फक्त एकाच व्यापाऱ्यांशी व्यवहार केल्याने आज असंख्य सभासदांना कमी भाव मिळाला यामागे संशय बळावला असून सुपारीला भाव वाढवून मिळावा यासाठी नथुराम महाडिक यांनी असंख्य सभासदाच्या सह्या घेऊन सहाय्य्क निंबंधक यांच्याकडे अर्ज सादर केला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सुपारी संघाचे माजी चेरमन महेश भगत यांनी केला आहे.
मुरुड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाने यंदा सुपारीला कमी भाव दिल्याबद्दल पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी चेरमन महेश भगत यांच्यसह आदेश दांडेकर,नाना गुरव,अस्लम हलडे,जगदीश पाटील,प्रवीण भायदे,नथुराम महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महेश भगत यांनी सांगितले कि,गेल्या वर्षी सुपारी बागायतदाराना आम्ही असताना ७५२० मणास भाव देण्यात आला मात्र यंदा हा भाव ६२०० रुपये दिला गेला म्हणजे सभासदांना एकूण १३२० रुपयांचा तोटा झाला आहे.त्याच्या अगोदरच्या वर्षी कोरोना असताना सुद्धा ६४०० चा भाव आम्ही मिळवून दिला होता.त्यामुळे सुपारी संघाने कमी भाव मिळवून दिल्याने सर्व सभासद नाराज व असमाधानी असल्याचे भगत यांनी सांगितले.
यावेळी आदेश दांडेकर यांनी सांगितले कि, ६ ऑगस्ट २०२३ रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेत अजेंड्यावरील दोन विषय रद्द करण्याची नामुष्की विद्यमान कार्यकारणीवर आली.अविश्वास सुद्धा पारित झाला.सुपारी संघाच्या प्रपत्रकात ५९५० भाव लिहिला गेला व प्रत्यक्षात सभासदांना ६२०० रुपये भाव देण्यात आला मग चेरमन यांनी सांगावे यातील खरा भाव कोणता. एकाच व्यापाराला लोड गेल्यामुळे त्या वेळेला चाललेल्या मार्केट रेट प्रमाणे ३० ते ४० लाखाचे नुकसान झाले असल्याचे बागायतदारांकडून बोलले जात आहे. सुपारी व्यापाऱ्याला विकल्यानंतर आलेली रक्कम एफ डी बनवून ठेवली जात होती. या नवीन कार्यकारणी सदस्यांनी ही कोटी रुपयांची एफडी महिनाभर करंट अकाउंट मध्ये ठेवून दिली. त्यामुळे बागायतदारांच्या नियोजन शून्य असलेल्या पैशांचं व्याजाचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व गैरप्रकारामुळे ठराव झाले असून संपूर्ण प्रकरणाची सहाय्य्क निंबंधक यांच्याकडून चौकशीची मागणी केल्याचे आदेश दांडेकर यांनी सांगितले.अयोग्य नियोजन व ढिसाळ कारभार यामुळे सभासदांना आर्थिक फटका बसला असून यामध्ये सभासदांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.सुपारीला चांगला भाव मिळाला असता तर बाहेरचे व्यापारी येथे येणार नाहीत सभासदांना चांगला भाव मिळाला तर सुपारीच्या लागवड क्षेत्रात वाढ करण्यास प्रोहत्साहन मिळणार होते.सुपारी संघ टिकला पाहिजे तो डुबीत जाता कामा नये अशी रास्त भावना सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी जगदीश पाटील यांनी विद्यमान कार्यकरणीवर अविश्वास येणे म्हणजे नामुष्की आहे.लोकांचे हित जोपासण्याकडे कार्यकरणीने लक्ष द्यावे आगामी दिवसात फरकाची रक्कम देऊ असे कार्यकरणीने जाहीर करावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.