मुरुड जंजिरा, अमूलकुमार
जैन उमेश रामचंद्र जाधव हे मजगाव येथे बेकारीचा व्यवसाय करतात.दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजून ११ मिनिट असताना बेकरी व्यवसायास आवश्यक असणारे इस्ट आणण्यासाठी बाजारात गेले होते.या ठिकाणी काही आदिवासी लोकांनी त्यांना जबर मारहाण केल्याने त्यांचा मुर्त्यू झाला अशी तक्रार त्यांच्या पत्नी साधना उमेश जाधव यांनी मुरुड पोलीस ठाण्यात नोंदवल्यामुळे यांच्यावर मुर्त्यूस जबाबदार म्हणून ३०४ अ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच प्रमाणे भादंवि कलम १४३,१४७,१४९,व ३२३ अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबतचे सविस्तर वृत्त असे कि, नवी आळी येथे किराणा दुकानाच्या येथे बेशुद्ध होण्यापूर्वी त्यांना सरणे आदिवासी वाडीमधील शांताराम दामू पवार,परशुराम दामू पवार,तुळसा शांताराम पवार व अन्य लोकांनी हाताबुक्क्यांनी मारहाण केली होती.या सर्वानी निष्काळजी पणे बेदम मारहाण केल्याने उमेश जाधव याना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मुर्त्यू झाला होता.वरील सर्व माझ्या पतीच्या मुर्त्यूस जबाबदार असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी साधना जाधव यांनी नोंदवताच या सर्वांवर ३०४ अ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या केस चा तपास पोलीस निरीक्षक नीता जाधव करीत आहेत.