उरणच्या ONGC प्रकल्पमधून तेलाची गळती

उरण, विरेश मोडखरकर

आज पहाटे चार वाजता उरणच्या ONGC प्रकल्पमधून कच्च्या तेलाची गळती झाली. मांगीन देवी मंदिराला लागून असणाऱ्या नाल्यातून HI गळती झाली असून, या तेलाचा प्रचंड टावंग येथील नाल्यासह समुद्राच्या पाण्यावर पसाराला आहे. तर प्रचंड प्रमाणात तेलाचा वास येथील परिसरामध्ये पसरला होता.

तेल गलती झाल्याचे लक्षात येताच प्रकल्पकडून नाल्यातून समुद्रामध्ये मिसाळणारे तेल थांबावण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आळा आहे. तर किनार्यावर आलेळा तेलाचा जाड थर जमा करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह सक्शन पपं, ड्रम, सक्शन वॅन घटनास्थळी कार्यरत झाल्या आहेत. दरम्यान येथील नाल्यातून बाहेर येणारे तेल येथील पिकट्या शेत जमिनीमध्ये जातं असल्याने, शेत पिकाचे नुकसान होणार असल्याचा दावा येथील शेतकरी करत आहेत. तर समुद्राच्या पाण्यामध्ये तेल मिसळल्याने किनारीभागावरील मासे आणि तत्सम जीव धोक्यात आले आहेत. तर यावर उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी ☝️☝️☝️किल्क करा

ONGC प्रकल्पमधून अशा प्रकारे अनेकदा तेल गळती झाली असून, घडलेल्या घटनांमधून आजवर पाच जणांचा जीव गेला आहे. यामध्ये एका स्थानिक नागरिक, तीन अग्निशमन दलाचे जवान आणि एका प्लांट मॅनेजरचा समावेश आहे.

संवेदनशील ONGC प्रकल्पमधून नियमित तेल आणि गॅसच्या वासामुळे येथील नागरिकांना आजराना सामोरे जावे लागतं आहे. मात्र त्याहीपेक्षा अशा घटनानमधून होणारे अपघात आणि त्याची दाहकदा एखादा वेळीस हजारो जीव घेईल की काय? याची जास्त भीती वाटत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page