माजी आमदार मनोहरशेठ भोईर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्या माध्यमातून दंडी दहीहंडी उत्सवाचे आयोजन.
उरण, सुशांत तांडेल
गोकुळाष्टमीनिमित्त शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण शहर शाखेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर व माजी नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून गुरुवार दिनाकं 07 सप्टेंबर 2023 रोजी उरण नगरपालिका मैदानात भव्य दिव्य अशा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

उत्सवामध्ये उरण तालुक्यातील नामांकित दहीहंडी पथकाने सहभाग नोंदवला होता. तर श्री होनेश्वरदेव गोविंदा पथक, बोरी या संघाने 2023 च्या दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. या स्पर्धेसाठी उरणकर नागरिकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला होता. यावेळी मोठ्या संख्येने उरणकर नागरिकांनी या दहीहंडी निमित्त आयोजित मनोरंजन कार्यक्रमाचा लाभ घेतला. यावेळी विजेत्यांना व सलामी देणाऱ्या पथकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.