उरण, वीरेश मोडखरकर
उरण, नागाव समुद्र किनार्यावर ONGC प्रकल्पमधून शुक्रवारी पहाटे तेल गळती झाली होती. मांगीन देवी मंदिरालगत असणाऱ्या नाल्यातून ही गळती होऊन, तेल समुद्र किनार्यावर पसरले होते. कोणतीही दुर्घटना अथवा पर्यावरणस हानी पोहचूनये यासाठी आज दुसऱ्या दिवशी देखील नाल्यावटे येणारे तेल जमा करण्याचे काम सुरु आहे.
ONGC प्रकल्पकडून आत्याल्प प्रमाणात तेल गळती झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात दोन दिवस तेल जमा करण्याचे काम सुरु असून, यासाठी अनेक कामगार, सक्शन पंप, सक्शन वॅन युद्धापातळीवर काम करत आहे. तर समुद्र पात्रामध्ये पसरलेले तेल साफ करण्यात येत असून, येथील समुद्रीय जीव, स्थानिक नागरिक तसेच पर्यंतनाला कोणताही धक्का लागणार नाही याची देखील दक्षता घेण्यात येत आहे. मात्र ONGC प्रशासनाकडून झालेल्या घटनेबाबत कोणताही खुलासा न केल्याने प्रशासन दोषीना पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे.