भरपावसात शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती
अलिबाग, प्रतिनिधी
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी अलिबाग येथे भाजप सरकार विरोधात जनसंवाद पदयात्रेचे निरीक्षक माजी खासदार सुरेश टावरे साहेब,जिल्हाअध्यक्ष महेंद्रशेठ घरत व सहप्रभारी श्रीरंग बरगे यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग शहरात भर पावसात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अलिबाग बस स्टॅंड पासून पुढे हुतात्मा स्मारकास अभिवादन करून हि जनसंवाद यात्रा बॅरिस्टर अंतुले भवन येथे या यात्रेचा शेवट करण्यात आला.यावेळी अंतुले भवन येथे सभा घेण्यात आली यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी काँग्रेस पक्षाच्या विविध विभागातील पदाधीकारी यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्हा काँग्रेस अंतर्गत उरण तालुका पर्यावरण विभाग अध्यक्ष श्री अंगत ठाकूर तर पनवेल तालुका पर्यावरण अध्यक्ष श्री संतोष म्हात्रे तसेच रायगड जिल्हा अंतर्गत पनवेल तालुका सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षपदी श्री. अमर गायकवाड यांची निवड करून त्यांना भिवंडी लोकसभेचे माजी खासदार श्री सुरेश टावरे साहेब, जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, श्रीरंग बरगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस ऍड प्रविणदादा ठाकूर यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.यावेळी बॅरिस्टर अंतुले भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना निरीक्षक सुरेश टावरे यांनी सांगितले कि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान धाब्यावर बसवून मोदी सरकारचा मनमानी कारभार देशात सुरू आहे. सर्व क्षेत्रात मोदी सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे, यातून निवडणूक आयोग व न्यायव्यवस्था सुद्धा सुटलेली नाही. आता बदल करायचा आहे आणि पुन्हा जनतेच काँग्रेस सरकार निवडून द्यायचे आहे ही भावना यावेळी व्यक्त केली.तर महेंद्रशेठ घरत यांनी सांगितले कि केंद्र आणि राज्य सरकारचा गलथान कारभार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभरात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत महागाई, वाढती बेरोजगारी, शेतीमालाला हमीभाव नसणे, कामगारांवर अन्यायकारक कायदे लादणे, शासकीय यंत्रणांचा गैरफायदा घेऊन दबाव तंत्राचा वापर करणे, राज्यातील जनता हैराण झाली आहे. हीच तक्रार सगळीकडे नागरिक करत आहे. भाजप सरकारने जनतेला पूर्णपणे दुर्लक्ष करून फक्त उद्योजकांसाठी काम करण्याचे धोरण हाती घेतले आहे. अश्या स्थितीत जनतेसाठी काँग्रेस पक्ष आणि राहुलजी गांधी संघर्ष करत असल्याची भावना यावेळी जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी या यात्रेदरम्यान बोलून दाखवली.
जनसंवाद यात्रेला पल्लवीताई रेणके, वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य इस्माईल घुले, राजाभाऊ ठाकूर, उपाध्यक्ष अबू खोत,कोकण फिशरमॅन अध्यक्ष मार्तंड नाखवा,अजगर दळवी,अल्पसंख्यांक अध्यक्ष अखलाक शिलोत्री, कोकण विभाग ओबीसी अध्यक्ष शंभू म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा ओबीसी अध्यक्ष वैभव पाटील, रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्ष उमेश भोईर,सरोज डाकी,जेष्ठ काँग्रेस नेते काका ठाकूर, सुनील थळे,रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल डवले, युवक व क्रीडा विभाग अध्यक्ष आदित्य घरत यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.शेवटी पत्रकार परिषद घेण्यात आली.