उरण, प्रतिनिधी
उरणच्या नागव समुद्र किनारी बंधऱ्याचे काम सुरु आहे. या बंधऱ्याला लागणारे दगड ठेकेदारामार्फत आणून, किनार्यावर रचले जात आहेत. यासाठी लागणारे हेवा डम्पर समुद्र पात्रातून किनाऱ्यालगत चालवले जात आहेत. मात्र यासाठी भरती, ओहटीचा अंदाज येणे आवश्यक आहे.

शनिवारी दुपारी १ च्या दरम्यान अशाच प्रकारे दगडाने भरलेला हेवा डम्पर समुद्रकीनारी उतरला, आणि भारतीचा अंदाज न आल्याने, समुद्राच्या रेतीमध्ये अडकला. दरम्यान या डम्परला काढण्यासाठी पोकलन मशीन प्रयत्न करू लागली. मात्र डम्पर काही बाहेर निघायचे नाव घेईना. अनेक प्रयत्नानंतर डम्परमधले दगड खाली केल्यानंतर, डम्पर बाहेर काढण्यात यश आले.