उरण, विरेश मोडखरकर
उरण तालुक्यातील बोकाडविरा गावामधील एक असं व्यक्तिमत्व, ज्याने कब्बडी सारख्या खेळाचे मैदान गाजवले आहे, समाज कार्यात देखील महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. तर राजकारणामध्येही आपली छाप सोडली आहे. अशा या व्यक्तिमत्वची आज एका वेगळ्या क्षेत्रामध्ये नव्या विक्रमकडे वाटचाल होत आहे.

अशा या व्यक्तिमत्वची आज एका वेगळ्या क्षेत्रामध्ये नव्या विक्रमकडे वाटचाल होत आहे. सध्या उरण तालुक्यातून संगीत क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवता असणारे हे नाव आहे गोपाळ पाटील. लहानपाणापासुन संगीताची आवड असणारे गोपाळ पाटील त्यांच्या या आवडीचा छंद एका वेगळ्या शिखरावर नेऊपाहत आहेत. यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु देखील केले आहेत. सध्या ते वेगवेगळ्या गायकांची शंभर गाणी एकाच वेळी गाण्याचा प्रयत्न करीत आहेत. साधारणतः नऊ तासात शंभर गाणी गाण्याचा त्यांचा हा प्रयत्न असेल. तर यामध्ये सोलो आणि डुएट या दोनही प्रकारात ते गाणी म्हणणार असून, त्यांचा इतर चमू त्यांना साथ देणार आहे.