उरण, ONGC तेल गळतीमुळे नुकसान नाही

उरण, विरेश मोडखरकर

उरण समुद्रकिनाऱ्याजवळ नुकतीच तेल गळती झाली होती. यामध्ये शेतकरी किंवा मच्छिमारांचे कोणतेही नुकसान झालेले नसल्याचे ONGC ने काढलेल्या पत्रकातून म्हटले आहे. दि.08 सप्टेंबर 2023 च्या पहाटे चार वाजता, ONGC उरण प्लांटमधील एका कच्च्या तेलाच्या साठवणुकीच्या टाकीतून किरकोळ प्रमाणात तेलाची गळती झाली होती. तर मुसळधार पावसामुळे गळती झालेले तेल स्ट्रॉम वॉटर ड्रेन वाहिनीत (नाल्यामध्ये) शिरल्याने, पावसाच्या पाण्यासोबत नाल्यातून वाहून आलेले तेल समुद्रकिनाऱ्यावरील खडकांवर पसरले.

उरण, समुद्र किनाऱ्यावरील तेल साफ करताना कामगार

प्रकल्पमधून तेल गळतीची माहिती मिळताच, ONGC ची ऑइल स्पिल रिस्पॉन्स (OSR) टीम समुद्रात तेल पसुरूनये म्हणून तैनात करण्यात आली. समुद्राच्या पाण्यात तेल मिसळून येथील समुद्रीय जीव आणि जैविक सामग्री नष्ट होऊनये यासाठी तात्काळ किनारपट्टीची साफसफाई सुरू करण्यात आली. तेल गळती झालेल्या दिवशी मुसळधार पाऊस पडल्याने आणि समुद्रकिनारा खडकाळ असल्याने, साफसफाईसाठी खूप मेहनत घ्यावी लागली. ओएनजीसी टीमच्या वेळेवर आणि अथक प्रयत्नांमुळे तेल समुद्रात शिरले नाही आणि सागरी जीवसृष्टीचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे ONGC ने काढलेल्या पत्रकातून म्हटले आहे.

येथील काही शेतकऱ्यांनी ONGC प्रकल्पतून निघणाऱ्या नाल्यामधून शेतीला पाणी घेण्यासाठी या नाल्याचा वापर केला आहे. ज्यामुळे ४ – ५ शेतामध्ये तेल पसर्णयाचा प्रकार झाला आहे. मात्र या प्रकारामुळे भातशेतीचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचेही ONGC कडून सांगण्यात येत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page